मराठा समाजाचे ओबीसीकरण करा - संभाजी ब्रिगेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:05 AM2021-06-04T04:05:48+5:302021-06-04T04:05:48+5:30
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाची ओबीसीकरण करावे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केली आहे. ...
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाची ओबीसीकरण करावे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केली आहे.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा २६ जून हा जन्मदिवस आहे. २६ जूनपर्यंत सर्व आमदार, खासदार, मंत्री व विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर घटनात्मक पर्याय निवडावा; अन्यथा संभाजी ब्रिगेड आक्रमक आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा दिला.
कोल्हापूर येथे २६ जूनला परिषद घेतली जाणार आहे. तोपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर २७ जूनपासून महाराष्ट्रात आंदोलन केले जाणार असल्याचे मनोज आखरे यांनी सांगितले. या आक्रमक आंदोलनाची झळ पोहोचली तर त्याला हेच मंत्री, आमदार, खासदार जबाबदार राहतील, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष दिनेश महाडिक, आदी मान्यवर उपस्थित होते.