कायद्याचे पालन हेच खरे महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:22+5:302021-04-15T04:06:22+5:30
लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी जे केले आहे ते शब्दात व्यक्त होऊ शकत ...
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी जे केले आहे ते शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. त्यांनी अभिवादन करण्यासाठी डीजे नसेल, जल्लोष नसेल त्याने बाबासाहेबांच्या स्थानाला कोणत्याही प्रकारे फरक पडणार नाही. तर बाबासाहेबांनी कायदे केले आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. कोरोना रुग्ण वाढत आहेत तर आपण घरात राहून भीमजयंती साजरी केली पाहिजे. कायद्याचे पालन हेच खरे महामानवाला अभिवादन ठरेल, असे रिक्षाचालक विजय सलवदे यांनी सांगितले.
दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी केली जाते. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे सरकारने निर्बंध लावले आहेत. निर्बंधांमुळे रिक्षाचालक विजय सलवदे यांनी रिक्षातच भीमजयंती साजरी केली.
विजय सलवदे म्हणाले की, मी माथाडी कामगार आहे आणि पार्टटाइममध्ये रिक्षा चालवतो. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सहकुटुंब जात असतो, पण आता कोरोनाचा काळ आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे सरकारने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे आम्ही चेंबूरला गेलो नाही. त्यामुळे पण जयंतीच्या दिवशी रिक्षातच बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.