- मनोहर कुंभेजकर
मुंबई--आज जगात 32 ते 35 वयोगटातील सर्वात जास्त तरुणाई भारतात आहे.त्यामुळे जगात भारत प्रथम क्रमांकाचा कौशल्य विकास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा आपला देश असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.आपला देश मजबूत,विकसित व समृद्ध होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची मोठी भूमिका आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबावावी लागेल. त्यामुळे येत्या 2022 पर्यंत देशातील 40 कोटी तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट पार पाडण्यासाठी तरुणांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासठी केंद्रीय कौशल्य कौशल्य विकास व उद्योजकता खाते सज्ज आहे अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी आज मालाड येथे दिली. मालाड पश्चिम एसव्ही रोड येथील एनएल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जगात प्रथम क्रमांकाचा कौशल्य विकास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खासदार शेट्टी आणि सदर प्रशिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या राज फाउंडेशन व भारत विकास परिषद या संस्थेचे अनुकरण देशात इतरांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी उत्तर मुंबईत आतापर्यंत सुमारे 50000 तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणारे खासदार गोपाळ शेट्टी यांचा कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे यांनी खास गौरव केला.
विशेष म्हणजे तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर्स) यांना खास कौशल्य विकास प्रशिक्षण देणारे उत्तर मुंबई हे देशातील पहिले उदाहरण असून आपण देशात ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात आपण खासदार शेट्टी यांच्या तृतीयपंथी यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा खास उल्लेख करू असे गौरवोद्गार त्यांनी काढले. येत्या तीन महिन्यात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहकार्याने चेंबूर येथे देशातील पहिले कौशल्य विकास अभ्यासक्रम केंद्र त्यानंतर 15 मार्च रोजी अहमदाबाद येथे दुसरे केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा मंत्री महोदयांनी यावेळी केली.
उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाल शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीत आज एन.एल. महाविद्यालयात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना अंतर्गत कौशल्य भारत-कुशल भारत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उत्तर मुंबईतील महाविद्यालयाचे सर्व पात्र विद्यार्थी, अपंग विद्यार्थी,उत्तर मुंबई भाजपाच्या बॅनर अंतर्गत संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करणारे तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर्स) यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तर नोकरी , प्लेसमेंट पार्टनरसह सर्व शैक्षणिक संस्थांना उत्तर मुंबईत कुशल भारत मिशन पुढे नेण्याच्या त्यांच्या सक्रिय भूमिकेबद्दल यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते व खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार गोपाळ शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी उत्तर मुंबईत आपण सदर योजना प्रभावीपणे राबवत असून देशात उत्तर मुंबई मतदार संघाचा कौशल्य विकास योजना राबवणारे देशात पहिला क्रमांक येण्याचे आपले ध्येय आहे. आता पर्यत या योजनेच्या माध्यमातून 50000 इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात आले असून 2022 पर्यंत सुमारे 4 लाख इच्छुकांना प्रशिक्षण देण्याचे आपले उद्धिष्ट आहे.महिला वाहन चालक,ब्युटी पार्लर आदींचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना तरुणींनी आपला उद्योग सुरू केला असे त्यांनी अभिमानाने सांगितले.जॉब सिकर्स बनू नका तर जॉब गिव्हर्स बना असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजीत मिश्र,राज फाउंडेशनचे डॉ.हरीश छेडा,उत्तर मुंबई भाजपा कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक युनूस खान,रुची माने,विक्रांत पंडीत,वैशाली जाधव,विविध संस्था,विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.