कमी दृश्यमानतेमुळे विमानांच्या लँडिंगमध्ये अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:40+5:302021-06-10T04:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विमानतळालाही बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसला. कमी दृश्यमानतेमुळे ४ विमानांना लँडिंग ...

Obstacles to aircraft landing due to low visibility | कमी दृश्यमानतेमुळे विमानांच्या लँडिंगमध्ये अडथळे

कमी दृश्यमानतेमुळे विमानांच्या लँडिंगमध्ये अडथळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळालाही बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसला. कमी दृश्यमानतेमुळे ४ विमानांना लँडिंग करण्यात अडचणी आल्या. ‘गो अराऊंड’ केल्यानंतर ही विमाने सुरक्षित धावपट्टीवर उतरवण्यात आली.

विमानांना हवेत झेप घेण्यासाठी किंवा खाली उतरताना धावपट्टी वैमनिकांच्या नजरेत असणे आवश्यक असते. पण अतिमुसळधार पावसात दृश्यमानता खालावल्याने विमानतळावर लँडिंग करताना विमानांना बऱ्याच अडचणी येतात. वैमानिकाला सुरक्षित लँडिंगबाबत खात्री नसल्यास अशावेळी गो अराऊंड केले जाते.

कमी दृश्यमानतेवेळी ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम’ अर्थात ‘आयएलएस’ प्रणाली उपयुक्त ठरते. या प्रणालीमुळे वैमानिकांच्या कॉकपिट स्क्रीनवर काल्पनिक धावपट्टी तयार होते. विमानांना खाली उतरण्यासाठीचा मार्ग व उड्डाण घेण्यासाठीचा मार्ग ‘आयएलएस’ प्रणालीमार्फत संगणकावर तयार होतो. त्याआधारे विमान खाली उतरवता येऊ शकते किंवा विमानाला उड्डाण घेता येते. मुंबई विमानतळावरही ही प्रणाली कार्यरत आहे.

दरम्यान, मुंबई विमानतळावरील सेवा वेळापत्रकानुसार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

...............................................................

Web Title: Obstacles to aircraft landing due to low visibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.