बाबा रामपालच्या निमित्ताने ‘जादूगर’चा वेध

By Admin | Published: November 23, 2014 12:41 AM2014-11-23T00:41:31+5:302014-11-23T00:41:31+5:30

हरियाणातला तथाकथित बाबा रामपाल हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या आश्रमाची छायाचित्रे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

On the occasion of Baba Rampal, the 'Magician' watch | बाबा रामपालच्या निमित्ताने ‘जादूगर’चा वेध

बाबा रामपालच्या निमित्ताने ‘जादूगर’चा वेध

googlenewsNext
हरियाणातला तथाकथित बाबा रामपाल हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या आश्रमाची छायाचित्रे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बाबाचे बॉलीवूडशी काहीच देणोघेणो नाही. पण एकंदर या बाबाचे कारनामे आणि परिस्थिती पाहता एका चित्रपटाची आठवण मात्र येते. दिवंगत दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी 8क्च्या काळात अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जादूगर’ चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या चित्रपटात एका बाबाचा आश्रम दाखवला होता. बाबाची भूमिका अमरीश पुरी यांनी केली होती. चित्रपटात  तुरुंगात असलेल्या एका भुरटय़ा चोराची ओळख जादूगाराशी होते. तो जादूगार छोटय़ा छोटय़ा जादू करून आपला उदरनिर्वाह चालवत असतो. याच जादूगाराच्या मदतीने तो चोर संत बनून एका आलिशान आश्रमाचा मालक बनतो. सामान्य लोकांच्या समस्या सोडवणो, प्रवचन करण्याचे कामही करतो. त्याचबरोबर आश्रमाआडून गैरव्यवहार आणि भयानक जुलूमही त्याचे चालू असतात.. हरियाणातल्या रामपालचे सत्य या चित्रपटासारखे फारसे नसले तरी काही गोष्टी नक्कीच मिळत्याजुळत्या आहेत. 
प्रकाश मेहरांच्या ‘जंजीर’ चित्रपटामुळेच अमिताभला भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर या जोडगोळीने अनेक चित्रपट केले. प्रकाश मेहरांचा शेवटचा चित्रपट ‘जादूगर’. तो बनवायला त्यांना खूप कालावधी लागला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपाटून आपटला. याबाबत प्रकाश मेहरा म्हणाले होते की, सामान्य लोकांच्या धार्मिक भावना अतिशय संवेदनशील असतात. या भावनांना ठेच पोहोचवणो त्यांना अजिबात मान्य नसते. या चित्रपटाने अशा ढोंगी बाबांपासून सावध राहा, असा संदेश दिला होता. पण लोकांना आमचे म्हणणो न पटल्याचे चित्रपटाला मिळणा:या प्रतिसादावरून दिसून आले, असेही मेहरांनी सांगितले होते. 
चित्रपटाच्या इतिहासात साधू-संतांच्या ढोंगीपणावर प्रकाश टाकणारा ‘जादूगर’ हा काही एकमेव चित्रपट नाही. पण या चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर बराच काळ अशा विषयाचे चित्रपट बनलेच नाहीत. मात्र अक्षय कुमारने दोन वर्षापूर्वी ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी त्याचा  आशय पूर्णपणो वेगळा 
होता. 
हा विषय आज मांडण्याचे कारण की, चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो. समाजात होणारे बदल आणि पद्धती टिपण्याचे अचूक काम चित्रपट करतो. पण समाजात घडणा:या प्रत्येक उलटसुलट घटनांचे सत्य चित्रपट सांगतोच असे नाही, किंबहुना चित्रपटाची हीही एक बाजू आहे. प्रकाश मेहरांच्या ‘जादूगर’ चित्रपटात दाखवलेल्या ढोंगी बाबाचे कारनामे वेगळे आणि रामपाल बाबाच्या आश्रमातली भयावह स्थिती वेगळीच. हे असे कधीही चित्रपटातून दाखवण्यात आलेले नाही. पण तरीही समाजाची हीच सत्य परिस्थिती आहे, ते नाकारून चालणार नाही. 

 

Web Title: On the occasion of Baba Rampal, the 'Magician' watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.