Join us

गांधी जयंतीनिमित्त साफसफाई मोहीम, विद्यार्थी पालकासह सर्वसामान्यांंचां सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:13 AM

चौपाट्यांवर वाहून येणारा कचरा, प्लास्टीकचा विळखा यामुळे मुंबईचा चेहरा विद्रूप होत आहे. जागतिक दर्जाचे हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबई : चौपाट्यांवर वाहून येणारा कचरा, प्लास्टीकचा विळखा यामुळे मुंबईचा चेहरा विद्रूप होत आहे. जागतिक दर्जाचे हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. या अंतर्गत महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे पालिकेने शिक्षक-विद्यार्थी आणि सर्वसामान्य मुंबईकरांनाही या मोहिमेत सहभागी केले व यांना स्वच्छतेची शपथच घ्यायला लावली.स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत मुंबईत बुधवारी तब्बल ५५ ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली. धकाधकीच्या मुंबई शहरात चौपाट्या या विरंगुळ्यासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. मुंबईत नऊ चौपाट्यांपैकी असलेल्या व नेहमीच शेकडो पर्यटकांची वर्दळ असलेल्या वर्सोवा, गिरगाव आणि जुहू या तीन चौपाट्यांची सफाई करण्यात आली. मोठ्या संख्येने मुंबईकरही स्वच्छतेच्या मोहिमेत उतरले होते.प्लास्टीकपासून मुंबईला सर्वाधिक धोका आहे. प्लास्टीकबंदीची मोहीम यशस्वी करण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबविण्यात आले. प्लास्टीकच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ५० खाजगी आणि ८० महापालिका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रॅली काढली. मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले होते. सायकल रॅलीही आयोजित केली होती.प्रतिबंधित प्लास्टीक केले जप्त२३ जून २०१८ पासून मुंबईत प्लास्टीकच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. त्यानुसार प्लास्टीकचे उत्पादक, विक्रेते व दुकानदारांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाई थंडावताच प्लास्टीकचा वापर मुंबईत पुन्हा सुरू होतो़ प्रतिबंधित प्लास्टीक जमा करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील व्यावसायिक व निवासी भागातून प्रतिबंधित प्लास्टीक जमा केले.स्वच्छतेच्या माहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे जनजागृतीबरोबरच काही विभागांमध्ये नागरिकांना स्वच्छतेची शपथ घेतली.दोन लाख नागरिकांचा सहभाग..मुंबईत सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाºया नागरिकांवर पालिकेने कारवाई सुरू केली. या कारवाईने मुंबईकरांना शहर स्वच्छ ठेवण्यास भाग पाडणे शक्य नाही, असे लक्षात आल्यावर पालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या मोहिमेत मुंबईकरांनाच सहभागी करून घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी मुंबईतील विविध भागांमध्ये पार पडलेल्या ५५ विविध स्वच्छता मोहिमांमध्ये दोन लाख नागरिकांनी सहभाग घेतल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.अशी सुरू आहेप्लास्टीकवर कारवाई२३ जून २०१८ ते १७ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ७६ हजार २८२ किलो प्लास्टीक पिशव्यांचा साठा जप्त करून चार कोटी १३ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.प्लास्टीकमुक्तीसाठी विद्यापीठाचा पुढाकारमुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या मदतीने प्लास्टीकमुक्त कॅम्पससाठी संकल्प रॅलीचे आयोजन केले होते. या संकल्प रॅलीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने विद्यापीठ प्लास्टीकमुक्त करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून महिन्यातून किमान दोन वेळा स्वच्छता अभियान राबवून प्लास्टीकमुक्तीकडे विद्यापीठ वाटचाल करणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.स्वच्छता व व्यसनमुक्ती कार्यक्रमांचे आयोजनमहात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त संपूर्ण देश गांधी व शास्त्रींच्या विचारांमध्ये न्हाऊन गेला होता. शासकीय व निम शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा इत्यादी ठिकाणी महात्मा गांधीजींची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई शहरासह उपनगरात ठिकठिकाणी स्वच्छता आणि व्यसनमुक्ती या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरे कॉलनीमध्ये ‘सिंगल युज प्लास्टीक’बंदीच्या पार्श्वभूमीवर सकाळी ८ वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका