वरळीत ‘मल्ल्या’ तर सायनला ‘सेल्फी’ची होळी

By admin | Published: March 23, 2016 03:01 AM2016-03-23T03:01:47+5:302016-03-23T03:01:47+5:30

होळीच्या निमित्ताने अपप्रवृत्तींचे दहन केले जाते. त्याचाच भाग म्हणून वरळी, सायन येथे हटके संकल्पनांवर आधारित होळी साजरी करण्यात येत आहे.

On the occasion of 'Mallya', Saina 'Selfie' Holi | वरळीत ‘मल्ल्या’ तर सायनला ‘सेल्फी’ची होळी

वरळीत ‘मल्ल्या’ तर सायनला ‘सेल्फी’ची होळी

Next

मुंबई : होळीच्या निमित्ताने अपप्रवृत्तींचे दहन केले जाते. त्याचाच भाग म्हणून वरळी, सायन येथे हटके संकल्पनांवर आधारित होळी साजरी करण्यात येत आहे. यंदा वरळी बीडीडी चाळीच्या प्रांगणात विजय मल्ल्या यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शिवाय, सत्ताधाऱ्यांनी विजय मल्ल्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले नाही या प्रकरणाचा निषेध करीत होळीच्या प्रतिकृतीवर ‘भाग मल्ल्या भाग’ असा उपहासात्मक संदेश लिहिण्यात आला आहे.
बीडीडी चाळीतील रहिवासी चंद्रकांत अवघडे सामाजिक घडामोडींवर प्रकाशझोत टाकणारी होळी उभारत आहेत. यापूर्वी
कसाबची फाशी, त्सुनामी, स्वाइन फ्लू, दिल्ली सामूहिक बलात्कार अशा अनेक विषयांवर त्यांनी होळी साकारली आहे.
सोशल मीडियाचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी सायन येथे अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. या ‘सेल्फी होळी’च्या माध्यमातून सोशल मीडियाच्या वाढत्या अतिरेकामध्ये त्या माध्यमाचा दोष नाही, असा संदेश यातून देण्यात आला आहे. सायन येथील सरदार नगरमधील महापालिका वसाहतीमध्ये या वर्षी मोबाइलमधील सेल्फीची होळी अमर व आशिष कुचेकर बंधूंनी साकारली आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियाचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी सायन येथे अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. सायन येथील सरदार नगरमधील महापालिका वसाहतीमध्ये या वषी ‘सेल्फी होळी’च्या माध्यमातून सोशल मीडियाच्या वाढत्या अतिरेकामध्ये त्या माध्यमाचा दोष नाही, असा संदेश यातून देण्यात आला आहे.बीडीडी चाळीच्या प्रांगणात विजय मल्ल्या यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शिवाय, सत्ताधाऱ्यांनी विजय मल्ल्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले नाही या प्रकरणाचा निषेध करीत होळीच्या प्रतिकृतीवर ‘भाग मल्ल्या भाग’ असा उपहासात्मक संदेश लिहिण्यात आला आहे.

Web Title: On the occasion of 'Mallya', Saina 'Selfie' Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.