८ हजार ४९० कामगारांना घरांचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:38 AM2020-03-03T05:38:20+5:302020-03-03T05:38:23+5:30
गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत आतापर्यंत तीन वेळा सोडत काढण्यात आली आहे.
मुंबई : गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत आतापर्यंत तीन वेळा सोडत काढण्यात आली आहे. या तीनही सोडतींमध्ये एकूण ११ हजार ९७६ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत ८,४९० गिरणी कामगारांना घराचा ताबा देण्यात आला आहे.
यापूर्वी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सदनिका सोडतीच्या पहिल्या टप्प्यात ६,९२५ सदनिकांची संगणकीय सोडत २८ जून २०१३ रोजी काढण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यात २,६३४ सदनिकांची सोडत ९ जून २०१६ रोजी काढली होती. तिसºया टप्प्यात एमएमआरडीएकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील २,४२७ सदनिकांची सोडत २ डिसेंबर २०१६ रोजी काढण्यात आली. अशा प्रकारे आतापर्यंत मुंबई मंडळातर्फे एकूण ११ हजार ९७६ सदनिकांपैकी ८,४९० सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला आहे.