Join us

सागरकिनारा झाला स्वच्छ

By admin | Published: September 20, 2014 10:50 PM

भारतासह जगभरातील 92 किनारी भागांच्या देशात सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार ‘जागतिक किनारा स्वच्छता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

जयंत धुळप - अलिबाग
भारतासह जगभरातील 92 किनारी भागांच्या देशात सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार ‘जागतिक किनारा स्वच्छता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. किनारा स्वच्छता मोहिमेच्या आयोजनाची जबाबदारी भारतीय तटरक्षक दलाने स्वीकारली. किनारी भागात आज ही मोहीम स्थानिक नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, मच्छीमार बांधव, स्थानिक जिल्हा प्रशासन व पोलीस यांच्या संयुक्त सहभागातून पूर्णत्वास आली. रायगडमधील विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी होऊन त्यांनी किनारे चकाचक केले आणि पर्यावरण रक्षणाचा नवा विचार नागरिकांना, समाजाला दाखवून दिला.
किनारा स्वच्छतेची मोहीम देशभरात राबविली जात असल्याची माहिती रायगडच्या सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेची जबाबदारी निभावणा:या भारतीय तटरक्षक दलाच्या मुरूड-जंजिरा येथील तटरक्षक तलाचे प्रमुख डेप्युटी कमांडर अनूज निर्वाल यांनी दिली. 
रायगडच्या सागरी किनारपट्टीत मुरूड, काशिद आणि अलिबाग येथे आयोजित या सागरीकिनारे स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी अलिबाग समुद्रकिनारी काही काळ कचरा गोळा करून केले. त्यांच्यासोबत अलिबागच्या जा.र.ह. कन्याशाळेच्या विद्यार्थिनी, अलिबागमधील महाविद्यालयीन विद्याथ्र्यानी मोहिमेत सहभागी होऊन अलिबागचा किनारा स्वच्छ केला. 
जमा केलेला कचरा अलिबाग नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या यंत्रणोने समुद्रकिना:यावरून ट्रॅक्टर्सच्या साहाय्याने उचलून त्याची विल्हेवाट लावली.
 
429 वर्षापूर्वी 1985मध्ये कॅलिफोर्निया कोस्टल कमिशनने आयोजित केलेल्या जगातील पहिल्या अभिनव ‘सागरीकिनारा स्वच्छता मोहिमे’त कॅलिफोर्नियाच्या किनारी भागातील तब्बल 8 लाख कॅलिफोर्नियन नागरिक सहभागी झाले. 
4दिवसभराच्या या मोहिमेत सहभागी झालेल्या विद्याथ्र्यानी कचरा गोळा करताना प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या, गणोशोत्सवात सजावटीकरिता वापरलेले विघटन न होणारे थर्माकॉल, दारूच्या रिकाम्या बाटल्या, पूजेतील निर्माल्य, फ्रुटी आणि पेप्सीची पॅकेट्स, काही प्रमाणात समुद्रात ओतले गेलेले बोटींचे टाकावू वंगण, तेल असा कचरा गोळा करण्यात आला.
 
‘हॉव्हरक्राफ्ट’चे आकर्षण
जिल्ह्यातील या सागरीकिनारा स्वच्छता मोहिमेकडे सर्वाचे लक्ष वेधून घेण्याकरिता तसेच त्याद्वारे नागरिकांचा स्वच्छता मोहिमेस प्रत्यक्ष सहभाग लाभण्याकरिता भारतीय तटरक्षक दलाचे एक महाकाय अत्याधुनिक ‘हॉव्हरक्राफ्ट’ अलिबागच्या किना:यावर आणण्यात आले होते. या हॉव्हरक्राफ्टमधील तटरक्षक दलाच्या जवानांनी पाण्यावर तरंगणारा कचरा संकलनाचे काम केले. आपण कोणता कचरा समुद्रात टाकतो ते  मोहिमेतील विद्याथ्र्याच्या लक्षात आल्यावर यापुढे समुद्रात किंवा पाण्यातही कचरा टाकणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली.