ऑक्टोबर संपत असताना झाली ‘हिट’ला सुरुवात;  कमाल तापमानात २७ ऑक्टोबरनंतर वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:39 AM2019-10-31T01:39:59+5:302019-10-31T01:40:24+5:30

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावरअतितीव्रचक्रीवादळ ‘क्यार’ आहे.

October ends with 'hit'; Maximum temperature rise after October 1 | ऑक्टोबर संपत असताना झाली ‘हिट’ला सुरुवात;  कमाल तापमानात २७ ऑक्टोबरनंतर वाढ

ऑक्टोबर संपत असताना झाली ‘हिट’ला सुरुवात;  कमाल तापमानात २७ ऑक्टोबरनंतर वाढ

Next

मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानात २७ ऑक्टोबरनंतर वाढ नोंदविण्यात येत असून, बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. त्यातच बुधवारी मुंबईकरांना बऱ्यापैकी उष्णतेसह उकाड्याला सामोरे जावे लागले असून, तापमानाचा पाराही चढाच राहिल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. परिणामी, संपूर्ण ऑक्टोबर महिना पाऊस आणि ढगाळ वातावरणाने ढवळून निघाला असतानाच ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी मुंबईकरांना ‘ऑक्टोबर हिट’ला सामोरे जावे लागत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावरअतितीव्रचक्रीवादळ ‘क्यार’ आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

आज कोकण, गोव्यात मुसळधार
३१ ऑक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल.

१ नोव्हेंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. गोव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल.

२ नोव्हेंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागात तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

Web Title: October ends with 'hit'; Maximum temperature rise after October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.