राज्यात वादळी पावसासोबत बसणार ऑक्टोबर हीटचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:10 AM2019-10-07T04:10:58+5:302019-10-07T04:15:02+5:30

या हवामान बदलाचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवसांत मुंबई शहरात गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे.

October Heat hit with stormy rain in the state | राज्यात वादळी पावसासोबत बसणार ऑक्टोबर हीटचा तडाखा

राज्यात वादळी पावसासोबत बसणार ऑक्टोबर हीटचा तडाखा

Next

मुंबई : मुंबईकरांना आता ऑक्टोबर हीटच्या झळा बसू लागल्या असतानाच, येत्या १० आॅक्टोबर रोजी मान्सूनही आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे. उत्तर भारतातून म्हणजे राजस्थानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असून, तिसऱ्या आठवड्यात मान्सूनचा परतीच्या प्रवासाचा वेग आणखी वाढणार आहे. तर दुसरीकडे राज्याला वादळी पावसाचा तडाखा बसणार असून मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी दोन अंशांची वाढ झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचा विचार करता, मुंबई शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तुरळक हलक्या सरींसह उष्ण व कोरडे वातावरण आहे, तसेच लक्षणीय पाऊस झाला नसल्याने, तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत पावसाचे प्रमाण कमी आहे. सांताक्रुझ वेधशाळेत तुरळक सरींची नोंद झाली आहे. दुसरीकडे उत्तर तेलंगणा आणि लगतच्या मराठवाड्यावर हवामानात बदल नोंदविण्यात येत आहे. परिणामी, गरम आणि आर्द्र वारे परिणाम करीत आहेत.

या हवामान बदलाचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवसांत मुंबई शहरात गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे. प्रामुख्याने हलका पाऊस पडेल. परिणामी, कमाल तापमानात वाढ होईल. हे कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविण्यात येईल. किमान तापमान २५ अंशाच्या आसपास राहील. वाºयाची दिशाही बदलत राहील. त्यामुळे त्यामुळे हवामान तुलनेने कमी दमट असेल.

प्रचाराच्या काळात वादळी पावसाचा अंदाज
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत ७ ते १२ आॅक्टोबर दरम्यान दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिकसह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यांत ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे. नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागांत १२ तारखेपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखेपर्यंत राहील. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांत १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल.
वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत वादळ आणि विजांपासून संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये.

मुंबईच्या पा-यात २ अंशांची वाढ
मुंबईकरांना ऑक्टोबर हीटचा तडाखा जोरदार बसू लागला असून, सरासरी कमाल तापमानात २ अंशाची वाढ झाली आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, यापूर्वी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३० ते ३२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. १७ आॅक्टोबर, २०१५ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस नोंद झाले. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे.

Web Title: October Heat hit with stormy rain in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.