आॅक्टोबर हीटने मुंबईकर आजारी; अशक्तपणा, डोकेदुखीचा त्रास अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:12 AM2018-10-13T03:12:12+5:302018-10-13T03:18:20+5:30

राज्यासह शहर-उपनगरात तापमानाचा पारा चढत चालला आहे. एका बाजूला पावसाळा जाऊनही साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही, तर दुसरीकडे आॅक्टोबर हीटमुळे मुंबईकर आजारी पडले आहेत.

October heat hits Mumbai; Anemia, headache problems | आॅक्टोबर हीटने मुंबईकर आजारी; अशक्तपणा, डोकेदुखीचा त्रास अधिक

आॅक्टोबर हीटने मुंबईकर आजारी; अशक्तपणा, डोकेदुखीचा त्रास अधिक

Next

मुंबई : राज्यासह शहर-उपनगरात तापमानाचा पारा चढत चालला आहे. एका बाजूला पावसाळा जाऊनही साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही, तर दुसरीकडे आॅक्टोबर हीटमुळे मुंबईकर आजारी पडले आहेत. त्वचाविकार, शरीरातील पाणी कमी होण्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, डोळ्यांचे जळजळणे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी मुंबईकरांना हैराण केले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी वेळीच लक्षणे ओळखून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर वातावरणातील वाढत्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. गॉगल घालून, स्कार्फ बांधून मुंबईकरांना घराबाहेर पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे रोज घराबाहेर निघणारा सामान्य माणूस ‘आॅक्टोबर हीट’मुळे पुरता होरपळून निघण्यास सुरुवात झाल्याने, जास्तीतजास्त पाणी पिण्याच्या सूचना फिजिशिअन डॉ. दिलीप सुर्वे यांनी केल्या आहेत. याशिवाय, शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी पाणी अधिकाधिक प्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


त्वचारोगतज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांनी सांगितले की, वाढत्या उन्हामुळे त्वचेविषयीच्या अनेक समस्याही उद्भवू लागल्या आहेत. बाह्यरुग्ण कक्षात येणाऱ्या रुग्णांपैकी खाज, त्वचेवरील डाग, त्वचेवर चट्टे येणे अशा अनेक तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत. या समस्यांवर उपाय म्हणजे घरातून बाहेर पडताना शक्यतो हात, चेहरा झाकून घराबाहेर पडणे. जेणेकरून, सूर्याची किरणे थेट शरीराला बाधा पोहोचवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे सनस्कीन लोशन वापरल्यासही या समस्या कमी होऊ शकतात. सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, या वाढत्या उकाड्यामुळे शरीरातील उष्णतादेखील वाढतेय. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ताप, सर्दी, खोकला आणि डीहायड्रेशनच्या तक्रारींचे रुग्ण वाढले आहेत. हवेत पसरणाºया विषाणूंमुळे नागरिकांना विविध आजार होऊ लागलेत. व्हायरस इन्फेक्शनमुळे अनेकांना ताप येणे, चक्कर येणे, डोळ्यांचे विकार आणि अपचनाची समस्या उद्भवते.


वातावरणातील बदलांचा परिणाम ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या स्वास्थ्यावर अधिक होतो. त्यामुळे या घटकांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बºयाचदा या घटकांतील व्यक्तींना श्वसनविषयक तक्रारीही उद्भवतात. श्वसनाशी संबंधित तक्रारींचा दीर्घ परिणाम फुफ्प्फुसांवर होण्याची शक्यताही असते. अशा परिस्थितीत वेळीच ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याची माहिती डॉ. शौनक शेणॉय यांनी दिली.

 

Web Title: October heat hits Mumbai; Anemia, headache problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.