एसटीच्या स्मार्टकार्डसाठी आॅक्टोबरचा मुहूर्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:16 AM2018-07-16T06:16:40+5:302018-07-16T06:16:44+5:30

लोकलच्या धर्तीवर स्मार्ट होण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी स्मार्टकार्ड सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

October for the smart card of ST! | एसटीच्या स्मार्टकार्डसाठी आॅक्टोबरचा मुहूर्त!

एसटीच्या स्मार्टकार्डसाठी आॅक्टोबरचा मुहूर्त!

googlenewsNext

- महेश चेमटे 
मुंबई : लोकलच्या धर्तीवर स्मार्ट होण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी स्मार्टकार्ड सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. देशातील सर्वात मोठ्या प्रवासी महामंडळाच्या प्रवाशांसाठी स्मार्टकार्ड तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने १५ आॅक्टोबरपर्यंत प्रवाशांना स्मार्टकार्डची वाट पाहावी लागणार आहे.
परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २० आॅगस्ट २०१७ रोजी आधार क्रमांकाला जोडलेली स्मार्टकार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. यात सुधारणा करून ३० नोव्हेंबर २०१७ रोजी रिचार्ज करता येणारे कार्ड १ मेपासून राज्यातील एसटी प्रवाशांना मिळणार असल्याची घोषणा महामंडळाने केली होती. तथापि, प्रत्यक्षात स्मार्टकार्ड बनविणाºया सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्याने स्मार्टकार्डला विलंब होत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.
प्रवासादरम्यान एसटी वाहक-प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशांचा वाद टाळण्यासाठी महामंडळाने स्मार्टकार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. हे स्मार्टकार्ड हस्तांतरणीय असल्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीने काढलेल्या स्मार्टकार्डवर कुटुंबातील अन्य व्यक्तींनादेखील प्रवास करता येईल. ५० रुपयांचे स्मार्टकार्ड घेत त्यावर किमान ५०० रुपयांपर्यंत रिचार्ज करण्याची सुविधा या कार्डमध्ये असणार आहे. एसटी आगारांसह आॅनलाइनदेखील कार्ड रिचार्ज करण्याचा पर्याय प्रवाशांसमोर असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
महामंडळाची आधुनिक ओळख असलेल्या शिवशाहीसह साधी, रातराणी, हिरकणी, शिवनेरी, अश्वमेध या बसमध्येदेखील स्मार्ट कार्ड वैध ठरणार आहे.
>तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू
एसटीच्या स्मार्टकार्डमध्ये तांत्रिक अडचणी असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे कॅशलेस स्मार्ट कार्डमध्ये योग्य ते बदल करण्याचे काम सुरू आहे. हे बदल पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात येईल. यानंतर स्मार्टकार्ड प्रवाशांना मिळणार आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत प्रत्यक्षात प्रवाशांना स्मार्टकार्ड वापरता येईल.
- रणजीत सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
एसटी महामंडळ

Web Title: October for the smart card of ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.