मुंबई : जागेच्या वादातून न्यायालयात खटल्यादरम्यान खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या दोन जणांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयातील लिपिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, या प्रकरणात वकिलाच्या अटकेचीही शक्यता आहे.जागेच्या वादातून सिव्हिल न्यायालयात दोघांनी खटला दाखल केला आहे. याचदरम्यान दोघांनीही खोट्या सह्या असलेली बनावट कागदपत्रे वकिलाच्या मदतीने न्यायालयात सादर केली. ही बाब लिपिकाच्या लक्षात येताच त्यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी वसीम इब्राहीम कुरेशी व शब्बीर हबीत अली काचवाला यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वकील मनोज हरीत याला माहिती असताना खोटी कागदपत्रे त्याने न्यायालयात सादर केल्याचे उघड झाल्याने त्यालाही या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खोटी कागदपत्रे दाखल करणाऱ्यांविरोधात गुन्हा
By admin | Published: October 15, 2016 7:16 AM