आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:55+5:302021-02-05T04:36:55+5:30
मेघवाडीत एकाला अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी करून तिला ...
मेघवाडीत एकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला मेघवाडी पोलिसांनी बुधवारी अटक केली. अटक व्यक्ती ही तिच्या मृत प्रियकराचा सख्खा भाऊ आहे.
पीडित तरुणीचे आरोपीच्या भावावर प्रेम होते आणि ते लवकरच लग्न करणार होते. मात्र लॉकडाऊनदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन प्रियकराचा मृत्यू झाला. भावाच्या पश्चात त्याचा लहान भाऊ म्हणजे अटक आरोपीने त्याचा मोबाइल वापरण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान भावाचे पीडितेसाेबत असलेले खासगी व्हिडीओ त्याला सापडले. त्याचा वापर करून त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.
याप्रकरणी तिने मेघवाडी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी चाैकशीअंती त्याला अटक केली. त्याचा मोबाइलही हस्तगत करण्यात आला.
.............................
.....................