Join us

मेट्रो प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; स्टेशनवर उतरताच २ रुपयात मिळणार भाड्याने सायकल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 8:39 PM

Metro: सध्या मुंबईत प्रवासासाठी सायकलींचा वापर फारच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रो वनसुद्धा या प्रयत्नात सामील झाली आहे

मनोहर कुंभेजकर

मुंबई- वर्सोवा-घाटकोपर मेट्रोने प्रवास करणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांना जागृती नगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर दोन रुपये वाजवी दरात भाड्याने सायकली आता उपलब्ध होणार आहेत. येत्या 24 तारखेपासून रोजी या सायकल योजनेचा शुभारंभ होणार असून जागृती नगर मेट्रो स्टेशनवर दर तासाला फक्त दोन रुपये वाजवी दरात इच्छूक प्रवाशांना भाड्याने सायकली मिळतील. 

24 फेब्रुवारी पासून मुंबई मेट्रोच्या जागृती नगर स्थानकावरून सायकल सेवा उपलब्ध होईल. प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे, भविष्यात मुंबई मेट्रो वन इतर स्थानकांवरही सायकली भाड्याने देण्याच्या पर्यायाचा विचार करेल. मेट्रोचे प्रवासी मायबीक अँपचा वापर करून या सेवेचा लाभ घेण्यासाठी जीपीआरएस वापरुन दुचाकी अनलॉक करण्यासाठी अॅप प्रवाशांना स्वत: मार्गदर्शन करेल अशी माहिती या कंपनीच्या प्रवक्त्याने लोकमतला दिली.

सध्या मुंबईत प्रवासासाठी सायकलींचा वापर फारच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रो वनसुद्धा या प्रयत्नात सामील झाली आहे. सायकल प्रवास करण्याचा हा हरित पर्याय त्यापैकी एक भाग आहे मेट्रो प्रवासी निरोगी जीवनशैली टिकवून आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी सदर सायकल प्रवास आधारवड ठरेल. मेट्रोच्या प्रवाशांना मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास करण्याव्यतिरिक्त आपल्या लोकप्रिय शॉपिंगच्या ठिकाणी भेट देण्यासाठी प्रवाशांना सायकल प्रवास हा पर्याय विशेष लोकप्रिय ठरेल अशी अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. 

सायकलिंगचे अनेक आरोग्यदायी अनेकसायकलमुळे इंधन बचत होत असून हवा व ध्वनी प्रदूषण देखील कमी होते. तसेच सायकलने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते.  

टॅग्स :मेट्रोसायकलिंग