पायाला फॅक्चर असतानाही अंमलदाराने केले अजगराचे रेस्क्यू ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:24+5:302021-01-03T04:07:24+5:30
धारावीतील घटना, नागरिकांकड़ून टाळ्यांच्या गजरात कौतुक पायाला फॅक्चर असतानाही अंमलदाराने केले अजगराचे रेस्क्यू ऑपरेशन धारावीतील घटना, नागरिकांकडून टाळ्यांच्या गजरात ...
धारावीतील घटना, नागरिकांकड़ून टाळ्यांच्या गजरात कौतुक
पायाला फॅक्चर असतानाही अंमलदाराने केले अजगराचे रेस्क्यू ऑपरेशन
धारावीतील घटना, नागरिकांकडून टाळ्यांच्या गजरात कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावीत एका व्यक्तीच्या घरात पहिल्या मजल्यावर अजगर आल्याचा कॉल धडकताच, पायाला फॅक्चर असताना क़ुर्ल्यातील अंमलदार मुरलीधर जाधवने घटनास्थळी धाव घेतली. आणि जीवाची पर्वा न करता ६ फुटी अजगराचे रेस्क्यू ऑपरेशन केले. त्यांनी अजगराला पकडून खाली आणताच रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करीत सलाम केला.
कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जाधव हे वयाच्या आठव्या वर्षी सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी अभ्यास करत सर्प पकडण्यास सुरुवात केली. पोलीस दलातील सेवेत तब्बल चार हजार सर्प पकडले. जर्मन देशानेही त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवली होती. विशेष म्हणजे, या कामाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ‘मानद वन्यजीव रक्षक अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे.
धारावीतील वाय जंक्शन परिसरात एका घराच्या पहिल्या माळ्यावर अजगर असल्याचा कॉल मिळताच, जाधव तेथे पोहोचले. अजगरामुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यामुळे नागरिकांनी घराखाली गर्दी केली होती.
जाधव यांनी पायाला फ्रॅक्चर असतानाही वर चढून ६ फुटी अजगर पकडला. ते अजगर घेऊन खाली येताच सर्वांनी त्यांच्या धाडसाचे व्हिडीओ करत खरा हीरो म्हणत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. जाधव यांनी अजगराचे रेस्क्यू ऑपरेशन करीत त्याला वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीदेखील पोलीस ट्विटर अकाउंटवरून त्यांचे कौतुक केले.