Join us

स्टेट बँक ऑफ इंडियात ऑफिसर होण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 1:30 PM

सरकारी नोकरीत करिअर करू इच्छिणाऱ्या युवा वर्गांसाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे

स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरच्या २००० पदांसाठी  भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये तीन बँक समूहांचा समावेश होतो. (१)  एसबीआय समूह, (२) ११ राष्ट्रीयीकृत बँका,

(३) प्रादेशिक ग्रामीण बँक.सरकारी नोकरीत करिअर करू इच्छिणाऱ्या युवा वर्गांसाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. देशातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, असिस्टन्ट, क्लर्क, मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी भरती होते. बँकेचे व्यवहार लोकाभिमुख व्हावे म्हणून संगणक प्रणाली सांभाळणे, कायदेशीर बाबी तपासणे, मनुष्यबळाचा योग्य वापर, नियोजन, प्रशिक्षण, बँकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची गरज असते. या पदांच्या भरतीसाठी दरवर्षी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येते. बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स व बँक क्लर्क या पदांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या प्रोबेशनरी ऑफिसर्स भरतीसाठी एसबीआय पीओ ही स्वतंत्र परीक्षा घेतली जाते.

एसबीआय  समूहाद्वारे प्रोबेशनरी ऑफिसरच्या भरतीसाठी वरील परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते.१) पहिला टप्पा- पूर्व परीक्षा १०० गुण २) दुसरा टप्पा - मुख्य परीक्षा २५० गुण ३) तिसरा टप्पा- मुलाखत ५० गुण. मुख्य परीक्षा व मुलाखतीचा गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. या परीक्षेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही शैक्षणिक पात्रता असून या परीक्षेसाठी वयोमर्यादा किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे आहे.  इतर मागासवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे तर अनुसूचित जाती व जमातीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असते.

 एसबीआय पीओ पूर्व परीक्षा १०० गुणांची व १०० प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाइन व एका तासाची असते. या परीक्षेत ३ मुख्य घटक असतात. १) इंग्रजी-  ३० प्रश्न- ३० गुण २) क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड- ३५ प्रश्न - ३५ गुण ३) रिझनिंग ॲबिलिटी ३५ प्रश्न - ३५ गुण. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात. एकूण पदसंख्येच्या १० पट उमेदवारांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण करून मुख्य परीक्षेस पात्र ठरविले जाते.

एसबीआय पीओ मुख्य परीक्षा २५० गुणांची असते. यात पेपर क्रमांक १ बहुपर्यायी स्वरूपाचा २०० गुणांचा १५५ प्रश्नांचा व तीन तासांचा असतो. यात चार मुख्य घटक असतात. १) इंग्रजी ३५ प्रश्न - ४० गुण

पेपर क्रमांक १ मध्ये उत्तीर्ण उमेदवाराचाच पेपर क्रमांक २ तपासला जातो. पेपर क्रमांक १ ला चुकीच्या उत्तराला गुणांच्या १/४ गुण वजा होतात. मोठ्या संख्येने उमेदवारांना बोलावतात.

टॅग्स :बँकनोकरीमुंबई