मुंबई : वाढत्या गर्दीतही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रवास करणाºया महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. महिला बोगींची अपुरी संख्या, स्थानकांवरील शौचालयांची दुरवस्था आणि अन्य समस्या जाणून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ महिला अधिकारी स्थानकांवर महिलांशी संवाद साधणार आहेत.गेल्या काही वर्षांपासून महिला प्रवासी संख्येत वाढ होत आहे. एकीकडे महिला प्रवासी वाढत असताना दुसरीकडे महिलांच्या सुविधा मात्र ‘जैसे थे’ आहेत. सोमवारपासून वांद्रे (लोकल) स्थानकातून या अभियानाला सुरुवात होणार आहे. स्थानकातील व्यवस्थापकांच्या कार्यालयात हे संवाद सत्र संपन्न होणार आहे. मंगळवारी मुंबई सेंट्रल, बुधवारी अंधेरी, गुरुवारी बोरीवली व शुक्रवारी विरार येथे चर्चासत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.महिला अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असल्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून यंदाचे वर्ष महिला व बालके यांच्या सुरक्षेचे वर्ष घोषित करण्यात आले आहे. या धर्तीवर सोमवारपासून पश्मिच रेल्वेवर वरिष्ठ महिला अधिकाºयांकडून महिला प्रवाशांशी संवाद साधला जाणार आहे. याचबरोबर सद्यस्थितीत उपलब्ध सुरक्षेबाबत सूचना आणि अभिप्राय घेतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.असे असेल संवादसत्र (वेळ स. १० ते ११)वार स्थानक ठिकाणसोमवार वांद्रे स्थानक व्यवस्थापक कार्यालयमंगळवार मुंबई सेंट्रल स्थानक व्यवस्थापक कार्यालयबुधवार अंधेरी स्थानक व्यवस्थापक कार्यालयगुरुवार बोरीवली महिला प्रतीक्षालय (फलाट क्र.१०)शुक्रवार विरार स्थानक व्यवस्थापक कार्यालय
अधिकाऱ्यांची महिला प्रवाशांसोबत ‘थेट भेट’; रेल्वे अधिकारी आजपासून जाणून घेणार समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 2:16 AM