अग्निसुरक्षेसाठी अधिकारी मैदानात, ३४ ‘अग्निसुरक्षा पालन कक्ष’ कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:39 AM2018-01-18T04:39:40+5:302018-01-18T04:39:48+5:30

आगीच्या वाढत्या दुर्घटनांनी मुंबईकरांना अग्निसंकटाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळेच अग्निसंकटाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी, आता अग्निशमन दलातर्फे मुंबईतील सर्व इमारतींमध्ये आग

Officers on Fire Safety, 34 'Fire Safety Cell' implemented | अग्निसुरक्षेसाठी अधिकारी मैदानात, ३४ ‘अग्निसुरक्षा पालन कक्ष’ कार्यान्वित

अग्निसुरक्षेसाठी अधिकारी मैदानात, ३४ ‘अग्निसुरक्षा पालन कक्ष’ कार्यान्वित

googlenewsNext

मुंबई : आगीच्या वाढत्या दुर्घटनांनी मुंबईकरांना अग्निसंकटाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळेच अग्निसंकटाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी, आता अग्निशमन दलातर्फे मुंबईतील सर्व इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांची खातरजमा करण्यासाठी, अग्निशमन केंद्रनिहाय ३४ ‘अग्निसुरक्षा पालन कक्ष’ कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रत्येक कक्षामध्ये मुंबई अग्निशमन दलातील अनुभवी व सक्षम अधिकाºयांची ‘नामनिर्देशित अधिकारी’ (अग्निसुरक्षा पालन अधिकारी) या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत रेस्टॉरंट आणि बारवर कारवाई केल्यानंतर या पथकाने आता चित्रपटगृहे आणि मॉल्सकडे आपला मोर्चा वळवला आहे.
कमला मिल कम्पाउंडमधील मोजोज बिस्टो आणि वन अबव्ह या रेस्ट-बारमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत १४ नागरिक मृत्युमुखी पडले. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर महापालिकेने मुंबईतील सर्व उपाहारगृहांची झाडाझडती सुरू केली. मात्र मुंबईत आगीच्या घटना वाढतच असून याचा ताण अग्निशमन दलावर पडत आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व इमारतींच्या अग्निसुरक्षेची खातरजमा करण्यासाठी अग्निशमन दलात हे विशेष पद निर्माण करण्यात आले आहे. विभाग कार्यालयातील पदनिर्देशित अधिकाºयांशी समन्वय साधणे, मुंबईतील इमारती, आस्थापने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मॉल्स, तळघरे, गोडाउन्स, रुग्णालये, नर्र्सिंग होम इत्यादींची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियमितपणे तपासणी करून अग्निसुरक्षाविषयक अटींची पूर्तता योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करणे आदी जबाबदारी या अधिकाºयांवर आहे.

चार जणांना न्यायालयीन कोठडी
कमला मिल कम्पाउंड आग प्रकरणी आरोपी असलेले युग पाठक, जिगर सिंघवी, कृपेश सिंघवी व अभिजीत मानकरला भोईवाडा सत्र न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ‘वन अबव्ह’ चे मालक जिगर सिंघवी, कृपेश सिंघवी, अभिजीत मानकर व मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठक यांना भोईवाडा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याने या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. जिगर सिंघवी, कृपेश सिंघवी आणि अभिजीत मानकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एन. एम. जोशी पोलीस ठाणे तपासात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला आहे. २९ डिसेंबर रोजी कमला मिल कम्पाउंडमधील मोजोस बिस्ट्रो व वन अबव्ह या पब्सना आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Officers on Fire Safety, 34 'Fire Safety Cell' implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.