अधिकाऱ्यांच्या खिशाला ‘खड्डा’, १७० तक्रारदारांना बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:06 AM2019-11-15T06:06:17+5:302019-11-15T06:07:24+5:30
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांची दरवर्षी गैरसोय होते. परंतु, या खड्ड्यांतून पहिल्यांदाच तक्रारदारांची कमाई झाली आहे.
मुंबई : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांची दरवर्षी गैरसोय होते. परंतु, या खड्ड्यांतून पहिल्यांदाच तक्रारदारांची कमाई झाली आहे. ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या योजनेनुसार २४ तास उलटून गेल्यानंतर भरलेल्या खड्ड्यांसाठी संबंधित तक्रारदारांना बक्षीस देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. अशा तब्बल १७० तक्रारदारांना ही रक्कम संबंधित विभागातून मिळत आहे. मात्र आपल्या खिशातून ही रक्कम द्यावी लागत असल्याने अधिकारीवर्गात नाराजीचा सूर आहे.
महापालिका प्रशासनाने १ ते ७ नोव्हेंबर या काळात ही योजना सुरू केली. या काळात १,६७० तक्रारी पालिकेच्या अॅपवर आल्या होत्या. पाचशे रुपये आपल्या खिशातून द्यावे लागणार असल्याने तक्रार येताच अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. ९२ टक्के तक्रारींचा दिलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आला, असा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र १७० खड्डे हे २४ तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतर भरले गेले नाहीत. परिणामी संबंधित विभागातील अधिकाºयांना आपल्या खिशातून बक्षिसाची रक्कम संबंधित तक्रारदाराशी संपर्क करून त्याला द्यावी लागत आहे.
भरलेल्या खड्ड्यांचे काम सुमार दर्जाचे असल्याचा आरोप
१ ते ७ नोव्हेंबर या काळात खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळावा ही योजना पालिकेने राबवली. १६७० तक्रारींपैकी ९२ टक्के खड्डे २४ तासांच्या आत बुजविण्यात आले. दिलेल्या मुदतीत भरलेल्या खड्ड्यांचे काम सुमार दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. ट८इटउढङ्म३ँङ्म’ीऋककळ या अॅपवर तक्रारींचा पाऊस पडत आहे.
>दादरच्या रहिवाशाला मिळाले ५,५०० रुपये
१२ तक्रारदारांना बुधवारी प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले. बक्षीस देण्यास सुरुवातीला टाळाटाळ करणाºया पालिकेकडून थेट पाचशे रुपये हातात पडत असल्याने तक्रारदारांना अनपेक्षित धक्का बसला. काही ठिकाणी अवघ्या दहा मिनिटांच्या विलंबामुळेही अधिकाºयांना लेटमार्क लागून त्यांना तक्रारदारांना पैसे द्यावे लागले. तर दादरमधील रहिवासी प्रथमेश चव्हाण यांनी शिवाजी पार्क ते प्रभादेवी या परिसरातील केलेल्या
११ तक्रारींची दखल २४ तासांनंतर घेतल्यामुळे त्यांना ५,५०० रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.