कृषी निविष्ठांवरील धाडीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:54 AM2018-04-10T05:54:10+5:302018-04-10T05:54:10+5:30

बियाणे, खते, कीटकनाशकांचे नमुने घेणे, धाडी घालणे, तपासणी करणे, साठा सील करणे आदी अधिकार आता मंडळ कृषी अधिका-यांना बहाल करण्यात आले आहे.

Officers of the Right to Duty on Agriculture Initiatives | कृषी निविष्ठांवरील धाडीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना

कृषी निविष्ठांवरील धाडीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना

googlenewsNext

- राजेश निस्ताने 
मुंबई : बियाणे, खते, कीटकनाशकांचे नमुने घेणे, धाडी घालणे, तपासणी करणे, साठा सील करणे आदी अधिकार आता मंडळ कृषी अधिका-यांना बहाल करण्यात आले आहे. या कृषी निविष्ठांच्या विक्री व गुणवत्तेवर त्यांचा वॉच राहणार असून त्यांना निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पूर्वी कृषी निविष्ठा परवान्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिका-यांकडे (एडीओ) होते. परंतु बोंडअळी हल्ला व कीटकनाशक फवारणीतील शेतकरी बळीनंतर कृषी आयुक्तांनी ‘एडीओं’कडील हे अधिकार काढून घेऊन आता कृषी अधीक्षकांना (एसएओ) बहाल केले. त्यामुळे परवान्याचेच अधिकार नाही तर कारवाईचे कसे ?असा प्रश्न उपस्थित करीत एडीओंच्या अधिनस्त यंत्रणेने आता हातवर केले आहे.
यंत्रणेचा अभाव
कृषी निविष्ठांचे नमुने घेऊन कारवाई करण्यासाठी कृषी अधीक्षकांची पुरेश्या यंत्रणेअभावी तारेवरची कसरत होणार आहे. मंडळ अधिका-यांना गुणवत्ता नियंत्रणाचे अधिकार दिले असले तरी त्यांना आधी त्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यांना मेटल सील, शिक्का तयार करावा लागेल. विदर्भ, मराठवाड्यात त्याची प्रत्येकी एकच अधिकृत प्रेस आहे. तेथे तसाच या कामासाठी किमान महिना लागतो. आता तर प्रत्येक जिल्ह्यातून मेटल सील व शिक्यांची मागणी होणार असल्याने ते किमान सहा महिने मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तपासणी रखडण्याची भीती आहे.
>बोगस बियाणे शेतक-यांच्या माथी
प्रशासनातील गोंधळामुळे निकृष्ट दर्जाचे, उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे सर्रास शेतकºयांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे.


कृषी परवान्यांची गती वाढली
कृषी अधीक्षकांकडे कृषी निविष्ठा परवान्यांची हजारो प्रकरणे तुंबल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २२ मार्च रोजी प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत कृषी आयुक्तालयाने आदेश दिल्याने प्रलंबित प्रकरणे आता वेगाने मार्गी लावली जात आहेत.

Web Title: Officers of the Right to Duty on Agriculture Initiatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.