गोमांस विक्रीवरून नालासोपारा बंद

By admin | Published: February 4, 2015 02:35 AM2015-02-04T02:35:22+5:302015-02-04T02:35:22+5:30

नालासोपारा येथे गोमांस विक्री वरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बंद पाळण्यात आला.

Offshore off sale | गोमांस विक्रीवरून नालासोपारा बंद

गोमांस विक्रीवरून नालासोपारा बंद

Next

वसई : नालासोपारा येथे गोमांस विक्री वरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बंद पाळण्यात आला. गोमांस विक्रीसीठी आणणाऱ्या टेम्पोला ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’च्या कार्यकर्त्यांनी पकडले होते. या घटनेनंतर नालासोपारा पोलिसांनी टेम्पोचालक -मालक व समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे विविध संघटनांनी एकत्र येऊन मंगळवारी नालासोपारा बंदचे आवाहन केले होते. बंदमुळे शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते.
भिवंडीहून नालासोपारा येथे आलेला हा टेम्पो सोपारा गावात पकडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला. नालासोपारा शहरात विविध संघटनांची संयुक्त बैठक होऊन गोवंशातील जनावरांची हत्या करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ नालासोपारा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत. तसेच रिक्षाचालकांनीही रिक्षा रस्त्यावर आणल्या नाहीत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. दंगल नियंत्रण पथक, धडक कृतीदल व अतिरीक्त पोलिसांचा यामध्ये समावेश होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: Offshore off sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.