"अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?" नितेश राणेंचा अंधारे आणि ठाकरे गटाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 04:27 PM2022-11-27T16:27:39+5:302022-11-27T16:30:39+5:30
Nitesh Rane: बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन?अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर घणाघाती टीका केली होती. त्याला आता नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे एका मुद्द्यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्या व्हिडीओचा आधार घेत नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन?अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन?
— nitesh rane (@NiteshNRane) November 27, 2022
अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? pic.twitter.com/gqShJyGYjv
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा राणेपुत्रांवर निशाणा साधला आहे. नारायणराव, आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही. माझा जो व्हिडिओ ते दाखवतात, तो व्हिडिओ जुना आहे. विचारांचं खंडन मंडन करावं लागतं, त्यांचा अभ्यास कमी आहे. मात्र, मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, अशा शब्दात अंधारेंनी राणेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला होता.