‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर

By स्नेहा मोरे | Published: August 27, 2022 08:43 PM2022-08-27T20:43:26+5:302022-08-27T20:43:33+5:30

पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या या मोहिमेचा आढावा शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे.

Oh Maharaja May the arrival of Bappa be uninterrupted municipality to fill potholes in Mumbai | ‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर

‘बाप्पां’चे आगमन निर्विघ्न होऊ दे रे महाराजा! मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने कसली कंबर

Next

मुंबई -मुंबईतील सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात. खड्ड्यांमुळे उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पालिकेची घाई सुरू झाली आहे. त्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून, रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत आहेत. 

पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या या मोहिमेचा आढावा शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. गणेशोत्सव कालावधीत रस्ते परीक्षणाच्या दृष्टीने सर्व संबंधित रस्ते अभियंत्यांना आणि कंत्राटदारांना देखील त्यांनी निर्देश दिले. त्यामुळे या मोहिमेला वेग मिळाला आहे. वेगवेगळ्या प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे लवकरात लवकर भरावेत आणि गणेशमूर्ती आगमन, विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याची विनंती गणेश मंडळांकडून करण्यात आली होती. खड्डा भरल्यानंतर अवघ्या सहा तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येईल, असे प्रशासनाने आश्वस्त केले होते. याव्यतिरिक्त प्रचलित पद्धतीनुसार देखील खड्डे भरले जात आहेत, जेणेकरून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडू शकतील.

२,२१३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे खड्ड़े भरलेही
मुंबई शहर विभागात ६९६ चौरस मीटर, पूर्व उपनगरांमध्ये ५६० चौरस मीटर आणि पश्चिम उपनगरांमध्ये ९५७ चौरस मीटर असे आतापर्यंत एकूण २,२१३ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे खड्डे रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरण्यात आले आहेत.

सहायक आयुक्तांनी पाहणी दौरे करावेत, आयुक्तांचे आदेश
सर्व विभागांचे सहायक आयुक्त यांनी आपापल्या भागातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवले जातील, यासाठी स्वतः क्षेत्रीय पाहणी दौरे करावेत, सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांनी देखील गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकांशी संबंधित प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी, असे निर्देश देखील आयुक्तांनी दिले होते. प्रत्यक्ष क्षेत्रीय आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आर-उत्तर, पी-उत्तर, पी-दक्षिण, के-पश्चिम, आणि एच-पूर्व विभागांमध्ये रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. मिलन सबवे येथे पावसाचे साचणारे पाणी उपसून साठवण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या जलाशयाची पाहणी देखील अतिरिक्त आयुक्तांनी केली.
 

Web Title: Oh Maharaja May the arrival of Bappa be uninterrupted municipality to fill potholes in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.