दिवा-मुंब्रा मार्गावर ओएचईत बिघाड

By admin | Published: June 5, 2016 01:19 AM2016-06-05T01:19:06+5:302016-06-05T01:19:06+5:30

दिवा-मुंब्रा अप धिम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने

OHE failure on the Diva-Mumbra route | दिवा-मुंब्रा मार्गावर ओएचईत बिघाड

दिवा-मुंब्रा मार्गावर ओएचईत बिघाड

Next

डोंबिवली : दिवा-मुंब्रा अप धिम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद झाली. सीएसटीला जाणारी एक लोकल दिवा स्थानकात २५ मिनिटांहून अधिक वेळ उभी होती. त्यात नेमका काय बिघाड झाला आहे, याबाबत प्रवाशांनी माहिती घेतली असता, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली.
त्या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या रांगा लागल्या होत्या. काही प्रवाशांनी भरउन्हात गाड्यांमधून उड्या टाकत ट्रॅकमधून पायी चालण्यास सुरुवात केली. मात्र, असह्य उन्हामुळे त्यांचे हाल झाले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खोळंबल्याचा फटका नंतर मुंबईहून येणाऱ्या वाहतुकीलाही बसला.
ठाणे, कल्याण स्थानकांत वाहतूक वळवण्याचे काम सुरू असल्याने, त्याचा फटका अन्य मार्गांवरील वाहतुकीलाही बसला.
ठाण्यापुढे आलेल्या लोकलच्या पार पारसिक बोगद्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. बिघाड किती वेळात दुरुस्त होईल, याची कल्पना नसल्याने ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती.
अखेरीस धिम्या मार्गाची वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली. मात्र, त्यामुळे तेथील वेळापत्रक कोलमडले. परिणामी, काही काळातच चारही मार्गांवरील वाहतूक कोलमडली. दुपारी ३ च्या सुमारास तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आणि त्यानंतर कूर्मगतीने लोकलची वाहतूक सुरू झाली. (प्रतिनिधी)

हरवलेली चिमुरडी सापडली
१डोंबिवली : दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका हजारो प्रवाशांना बसला. त्यातच धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावरून वळवल्याने अनेक समस्या उद्भवल्या. रेल्वेच्या या घोळात आईसोबत परळला जाण्यास निघालेली इक्र वासिम अन्सारी ही सहा वर्षांची मुलगी डोंबिवली स्थानकात फलाट-५ वरून प्रवास करत असताना हरवली. लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती सुखरूप मिळाली आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
२फलाट-५ वरील गर्दीत ती हरवली. मात्र, मुंब्रा स्थानकातील लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने ती तेथील पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यांनी तिची विचारपूस केली आणि तातडीने उद्घोषणा केली. ती ऐकून आईने पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांना त्यांची चिमुरडी सुखरूप सापडली आणि तिला रडू कोसळले. त्यांनी लगेचच इक्रला कवटाळत गर्दीत हात कसा काय सुटला, याची विचारणा केली. हा प्रसंग पाहून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच गहिवरून आले.

Web Title: OHE failure on the Diva-Mumbra route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.