ओला, उबरवर निर्बंध आणणार

By admin | Published: September 2, 2016 02:12 AM2016-09-02T02:12:50+5:302016-09-02T02:12:50+5:30

ओला, उबरवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप करत, सर्व युनियनना गुरुवारी

Ola, bring restrictions on recovery | ओला, उबरवर निर्बंध आणणार

ओला, उबरवर निर्बंध आणणार

Next

मुंबई : ओला, उबरवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप करत, सर्व युनियनना गुरुवारी चर्चेसाठी बोलावले. या बैठकीनंतर रावते यांनी एसटी महामंडळाच्या एका कार्यक्रमात ओला, उबरवर निर्बंध आणणारच, अशी माहिती दिली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशीही बोलणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या मागण्यांसाठी ३१ आॅगस्ट रोजी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनने एक दिवसीय संप पुकारला होता. युनियनची ओला, उबरची प्रमुख मागणी लक्षात घेऊन गुरुवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि परिवहन आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रिक्षा-टॅक्सी युनियनची बैठक पार पडली. या बैठकीत ओला-उबरवर निर्बंध आणावेत आणि काळ्या-पिवळ्या रिक्षा, टॅक्सी चालकांना उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या संदर्भात एका कार्यक्रमानंतर बोलताना रावते यांनी ओला, उबरवर निर्बंध आणणार असल्याचे स्पष्ट केले. युनियनसोबत झालेल्या बैठकीबाबतची माहिती देत, केंद्राच्या असलेल्या एका समितीपुढेही मुद्दा मांडण्यात येईल. यासाठी नियमावली तयार करण्यावर भर देत आहोत. मात्र, उत्पन्न वाढवायचे असेल, तर काळ््या-पिवळ््या रिक्षा, टॅक्सी चालकांनी आपली वर्तणूकही बदलणे आवश्यक आहे, तरच प्रवासी आकृष्ट होतील, अशी सूचनाही त्यांनी केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

एसी बसेस वाढवण्यावर भर : अवैध वाहतुकीमुळे एसटीला फटका बसत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी एसटीकडून अनेक पर्याय शोधले जात आहेत. त्यामुळे भविष्यात एसी बसेसची संख्या वाढवण्यावर भर असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Ola, bring restrictions on recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.