मुंबई : आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ओला-उबर चालकांकडून सोमवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ओला-उबर चालक सुरुवातीला वाहने घेऊन भारतमाता येथे एकत्र जमतील, त्यानंतर मोर्चा पुढे निघेल. वाहतूक पोलिसांनी वाहनांची अडवणूक केल्यास सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पायी मोर्चा निघणार आहे.मूळ भाडे वाढवावे, प्रतिकिलोमीटर दरांत वाढ करावी आणि ओला-उबर कंपन्यांनी आपले कमिशन कमी करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी ओला-उबर प्रशासनाविरुद्ध महिनाभरातच दुसऱ्यांदा संप सुरू आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला संप सोमवारी आक्रमक रूप घेणार असल्याचे संघाचे म्हणणे आहे. सरकारी आशीर्वाद असल्यामुळे ओला-उबर व्यवस्थापनाकडून चालकांची गळचेपी दिवसेंदिवस वाढत आहे, असा आरोप चालकांकडून करण्यात आला.मोर्चासंबंधी रविवारी सर्व चालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीनुसार सोमवारी चिंचपोकळी येथील भारतमाता परिसरातून ओला-उबरसाठी कार्यरत असलेली वाहने घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे. ऐन वेळी वाहतूक पोलिसांनी अडवणूक केल्यास पायी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले.या मोर्चाबाबत वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत काहीही बोलणार नसल्याचे सांगितले.आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ओला-उबर चालकांनी अकरा दिवस संप पुकारला होता. या वेळी व्यवस्थापनाने ‘फेºयांनुसार पैसे’ देऊ आणि १५ नोव्हेंबरपूर्वी मूळ भाडेवाढीचा प्रस्ताव देऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावू, असे लेखी आश्वासन मंत्री रावते यांच्यासमोर दिले होते. संप काळात चालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.प्रतिसादाबाबत संदिग्धतामुंबईत अॅप बेस्ड टॅक्सी सेवेत ओला-उबर कंपन्याचे प्रमाण जास्त आहे. तथापि, महिनाभरात दुसºयांदा संप पुकारल्यामुळे वाहनांचे हप्ते, घरखर्च यासह अन्य प्रश्न अनुत्तरित ‘संप नको’ अशी भूमिका ओला-उबर चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. यामुळे सोमवारी संघाच्या भारतमाता ते मंत्रालय मोर्चाला चालकांच्या प्रतिसादाबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे....म्हणून अॅप बेस टॅक्सीसेवा लोकप्रियशहरातील दमट वातावरणातील वाहतूककोंडीत ‘आल्हाददायक ’प्रवासाचा अनुभव घेता यावा, यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने अॅप बेस्ड टॅक्सीसेवेचा वापर करतात.‘वन क्लिक बुकिंग’ आणि ‘प्रवासी सुरक्षा’ ही अॅप बेस टॅक्सींची महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याने, अल्पावधीत अॅप बेस टॅक्सीसेवा उपक्रम सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरला आहे.प्रवासाच संभाव्य भाडे अॅपमध्ये दिसत असल्याने, प्रवाशांना आर्थिक लुटीची भीती राहत नसल्याने मुंबईसह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अॅप बेस टॅक्सी उपक्रमाला चांगला प्रतिसाद.मात्र, गेल्या काही काळात व्यवस्थापनाने कमिशनमध्ये वाढ केल्याने चालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
ओला-उबर चालक मंत्रालयावर धडकणार!; वाहतूक पोलिसांनी रोखल्यास पायी जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:37 AM