Ola, Uber Taxi: ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यानंतर भाडे नाकारण्याच्या ७९ टक्के तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:15 AM2022-04-08T06:15:59+5:302022-04-08T06:16:31+5:30

Ola, Uber Taxi: भाडे नाकारणे, पैशांसाठी किचकिच करणे आणि प्रवाशांशी विनाकारण वाद घालण्याच्या सवयींची आता ओला आणि उबेर चालकांनादेखील लागण झाली आहे.

Ola, Uber Taxi: Ola-Uber has been hit by rickshaws, taxis, 79 per cent complaints of fare denial after stating location | Ola, Uber Taxi: ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यानंतर भाडे नाकारण्याच्या ७९ टक्के तक्रारी

Ola, Uber Taxi: ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यानंतर भाडे नाकारण्याच्या ७९ टक्के तक्रारी

Next

 मुंबई :  भाडे नाकारणे, पैशांसाठी किचकिच करणे आणि प्रवाशांशी विनाकारण वाद घालण्याच्या सवयींची आता ओला आणि उबेर चालकांनादेखील लागण झाली आहे. सुरुवातीला प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सीचालकांसोबत यासाठी वाद घालावा लागत होता. मात्र यात ओला आणि उबेरसारख्या सेवांचीही भर पडली आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत भाड्याचे ठिकाण सांगितल्यानंतर संबंधित ठिकाणचे भाडे चालक रद्द करत असल्याची तक्रार ७९ टक्के प्रवाशांनी केली आहे.

लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणाअंती ॲप टॅक्सी प्रवाशांनी या सेवांबाबत तक्रारींचा पाढाच वाचला असून, हे सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावर करण्यात आले अहे. यात देशातील ३२४ जिल्ह्यांतील ६५ हजार प्रवासी सहभागी झाले होते. या सर्वेक्षणानुसार, गेल्या १२ महिन्यांत ५८ टक्के ॲप टॅक्सी ग्राहकांनी टॅक्सीने प्रवास केला. प्रवास सुखाचा व्हावा म्हणून या सेवा वापरल्या जात असल्या तरी याचा फार काही चांगला अनुभव प्रवाशांना आलेला नाही. चालकांकडून भाडे रद्द करण्याच्या समस्या कायम असल्याचे ७१ टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे. आपल्याकडून प्रवासाचे अधिकचे पैसे घेतल्याचे ४५ टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे. काही ग्राहकांनी तर चालकांकडून दादागिरीची भाषा वापरली जात असल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

काय आहेत तक्रारी?
 चालकांनी भाडे रद्द केले
 चालकांना डिजिटल पेमेंटऐवजी रोख रक्कम हवी
 दीर्घ काळ प्रतीक्षा
 चालकाची 
गैरवर्तणूक
 अत्याधिक वाढीव शुल्क 

कोणी किती वेळा प्रवास केला
१ % : ५१ - १०० वेळा
५ % : २६ - ५० वेळा
३ % : ११ - २५ वेळा
१३ % : ६ - १० वेळा
३४ % : १ - ५ वेळा

प्रवाशांना या सेवेचा वापर का केला?
२७% ग्राहक सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक वाहतूक वापरू 
इच्छित नाही.
१७% ग्राहकांकडे वैयक्तिक वाहन किंवा चालक उपलब्ध नाही.
२१% ग्राहकांना ही सेवा सोयीची वाटते.
२३% ग्राहकांना ही सेवा सुरक्षित आणि सोयीची वाटते.

कोरोना काळात कशी होती सेवा 
३५% ग्राहकांनी मास्किंग, सामाजिक अंतर आणि स्वच्छता यांचे पालन चांगले असल्याचे सांगितले.
११% ग्राहकांनी ते सरासरी असल्याचे सांगितले.
७%ग्राहकांनी ते खराब असल्याचे सांगितले. 
२%  ग्राहकांनी ॲपआधारित टॅक्सीने १०० पेक्षा अधिक वेळा प्रवास केला आहे.

का सेवा नाकारली?
४७% ग्राहकांनी ड्रायव्हर्सनी राइड रद्द केल्याचे सांगितले.
३२% ग्राहकांना सर्च प्राइसिंगबाबत समस्या आली.
९% ग्राहकांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली.
४% ग्राहकांनी शुल्कामुळे सेवा रद्द केली.

Web Title: Ola, Uber Taxi: Ola-Uber has been hit by rickshaws, taxis, 79 per cent complaints of fare denial after stating location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.