मुंबई : वृद्ध खातेदारांनो, जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर जरा सावधान राहा. कारण वृद्ध खातेदारांना एटीएम मशिन खराब असल्याचे सांगत लुबाडणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. अशा शिवकुमार मिश्रा आणि शैलेंद्र मिश्रा या दोन लुटारूंना गुन्हे शाखेने अटक केली आहे.गॅ्रण्टरोड परिसरात तक्रारदार वयोवृद्ध दाम्पत्य राहते. १८ मे रोजी ते येथील एका एटीएममधून पैसे काढण्यास गेले होते. एटीएम सेंटरमधील एका मशिनमध्ये कार्ड स्वॅप केले. तेव्हा तेथील एका तरुणाने मशिन खराब असल्याचे सांगून दुसºया मशिनमध्ये पैसे काढण्यास सांगितले. त्यानुसार तेथून पैसे काढतेवेळी एक तरुण माझ्याकडे डोकावत होता. हे लक्षात येताच त्यांनी बँकेला माहिती देत कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. त्या बाहेर पडताच तेथील दुकलीने त्यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढल्याचे समोर आले.त्यांनी याबाबत १ जुलै रोजी डॉ. दा.भ. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कक्ष २ने तपास सुरू केला. तपासात ही दुकली मीरारोड येथे राहत असल्याचे समोर आले. त्यानुसार दोघांनाही गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याविरुद्ध शिवाजी पार्क आणि बोरीवलीमध्ये ३ गुन्हे दाखल आहेत.
वृद्ध खातेदारांनो, सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:51 AM