सागरी सेतूवरून वृद्ध व्यावसायिकाची आत्महत्या
By admin | Published: August 20, 2014 02:37 AM2014-08-20T02:37:31+5:302014-08-20T02:37:31+5:30
लालचंद राठोड या 65वर्षीय वृद्धाने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून राठोड यांनी आत्महत्या केल्याचा संशय वांद्रे पोलीस व्यक्त करीत आहेत.
Next
मुंबई : लालचंद राठोड या 65वर्षीय वृद्धाने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून राठोड यांनी आत्महत्या केल्याचा संशय वांद्रे पोलीस व्यक्त करीत आहेत.
राठोड व्यावसायिक असून, मध्य मुंबईत वास्तव्यास होते. सकाळी ते आपल्या कारमधून कार्यालयाकडे निघाले होते. अचानक त्यांनी आपल्या ड्रायव्हरला कार सागरी सेतूवर नेण्याचे आदेश दिले. कार सेतूवरून जात असताना त्यांनी मध्येच थांबण्यास सांगितले. लघवीचा बहाणा करून ते खाली उतरले आणि त्यांनी खाली उडी मारली. ड्रायव्हरनेच पोलीस नियंत्रण कक्ष व राठोड यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. राठोड यांच्या शिखात एक चिठ्ठी सापडली. त्यात आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे राठोड यांनी लिहिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र ढवळे यांनी सांगितले.