Join us

बँकेतच वृद्धाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पैशांच्या बंडलमधील बनावट नोटा काढून देण्याच्या बहाण्याने वृद्धाला गंडविल्याचा प्रकार पायधुनीत समोर आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पैशांच्या बंडलमधील बनावट नोटा काढून देण्याच्या बहाण्याने वृद्धाला गंडविल्याचा प्रकार पायधुनीत समोर आला आहे. यात एकूण १८ हजार रुपयांच्या रकमेवर ठगाने हात साफ केला. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

भांडुप परिसरात राहणारे ६० वर्षीय तक्रारदार माथाडी कामगार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले. अशात, नुकतेच घरखर्चासाठी पैसे काढण्यासाठी ते ३० तारखेला बँकेत गेले. बँकेतून ५० हजार काढून मोजत असताना, बँकेत आलेल्या ठगाने त्यांना बंडलमध्ये खोट्या नोटा असल्याचे सांगितले आणि खोट्या नोटा बाजूला काढून देण्याच्या बहाण्याने १८ हजार रुपये काढले व दोन नोटा खोटा असल्याचे दाखवून तो निघून गेला. तक्रारदार यांनी पुन्हा पैसे मोजताच त्यात १८ नोटा कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत बँक अधिकाऱ्यांना सांगितले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पायधुनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहेत.