Join us

पोलीस असल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांवर हात साफ

By मनीषा म्हात्रे | Published: September 07, 2022 7:39 PM

परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे आरोपीचा शोध सुरु आहे. 

मुंबई : चोरीच्या घटना वाढत असल्याने दागिने लपवून देण्याचा सल्ला देत तोतया पोलिसाने वृद्धाच्या  दागिन्यांवर हात साफ  केल्याची घटना बुधवारी चेंबूरमध्ये घडली. यामध्ये त्यांचे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करत आहे.

चेंबूर परिसरात राहणारे मितीन ठक्कर (६२) हे बुधवारी  सकाळी मॉर्निंग वाकला जात असताना त्यांची फसवणूक झाली. दोन ठगांनी त्यांना गाठून पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच सोन्याचे दागिने घालून फिरू नका ते काढून ठेवा असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दागिने काढून पाकिटात ठेवत असताना ठगांनी बोलण्यात गुंतवून दागिने स्वतःकडे घेतले. त्यानंतर दोघेही पसार झाले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुंन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे आरोपीचा शोध सुरु आहे. 

 

टॅग्स :मुंबई