मुंबई : एस.व्ही. रोड येथील जुन्या ओशिवरा पूल हा गेल्या दीड वर्षापासून धोकादायक झाल्याने येथून फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होती. पण, आता या पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
ओशिवरा पूल धोकादायक झाल्याने या पुलाची नव्याने पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. पण, शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यानुसार जुन्या ओशिवरा पुलाच्या संपूर्ण पुनर्बांधणीच्या कामाचा प्रारंभ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शनिवार पार पडला. याप्रसंगी वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर फणसे, विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर, गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे, उपविभागप्रमुख राजू पाध्ये, उपविभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, शाखाप्रमुख गोविंद वाघमारे, महिला शाखासंघटक कल्पना कोकणे, युवासेना विभाग अधिकारी मोहित पेडणेकर, कार्यालयप्रमुख ज्ञानेश्वर जाधव, आदी उपस्थित होते.