जव्हारमधील जुने पेट्रोलपंप सील

By admin | Published: July 29, 2014 12:04 AM2014-07-29T00:04:11+5:302014-07-29T00:04:11+5:30

एवढ्या मोठ्या फरकाने भेसळ युक्त इंधन विक्री केले जात असून ग्राहकांची घोर फसवणूक पंप चालवणाऱ्यांनी केलेली आहे.

Old petrol pump seals in jawar | जव्हारमधील जुने पेट्रोलपंप सील

जव्हारमधील जुने पेट्रोलपंप सील

Next

जव्हार : जव्हार येथील कब्रस्तान समोरील भारत पेट्रोलियम कं. चे जुने पेट्रोलपंप भेसळयुक्त येत असल्याचे आणि मापाप्रमाणे मिळत नसल्यामुळे नगरसेवक नरेंद्र प्रभू यांच्या तक्रारी अर्जावरून जिल्हा पुरवठा कार्यालयातील अव्वल कारकून आणि नायब तहसीलदार जव्हार यांनी संयुक्त कारवाई करून नुकताच पंचनामा करून त्रुटी आढळल्यामुळे तात्काळ पेट्रोलपंप सील केलेले आहे.
तपासणी वेळी सर्वप्रथम पेट्रोल व डिझेलचा साठा तपासण्यात आला. त्यात पेट्रोलचा साठा शिल्लक नोंद ८९९३ लि. विक्री ७५७ लि. शिल्लक ८२३६, व ड्रिपनुसार शिल्लक आढळून आला, प्रत्यक्षात अभिलेखानुसार व ड्रिपनुसार येणाऱ्या साठ्यात ११३.९२ लिटर इतका फरक आढळून आला, तसेच डिझेलमध्ये शिल्लक नोंद ९४११ लि., एकुण -९४११ लि., विक्री-१०४९ लि., शिल्लक-८३६२, व ड्रिपनुसार शिल्लक ९१७१.१६ साठा आढळून आला. प्रत्यक्ष अभिलेखानुसार व ड्रिपनुसार येणाऱ्या साठ्यात ८०९.१६ लि. इतका फरक पंचनाम्या दरम्यान आढळून आला.
एवढ्या मोठ्या फरकाने भेसळ युक्त इंधन विक्री केले जात असून ग्राहकांची घोर फसवणूक पंप चालवणाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे जव्हारमध्ये इंधन भरवयाचे की नाही ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यानंतर पुरवठा विभागाकडून व कंपनीकडून सदर पंपाची तपासणी केली जात होती का ? आणि केली जात होती तर इतका फरक कसा ? तसेच जव्हारमध्ये असलेल्या इतर पेट्रोलपंपाची नियमित तपासणी होते का ? असा संतप्त प्रश्न ग्राहकांना पडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Old petrol pump seals in jawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.