फायनान्सच्या नावाखाली आजोबा चालवायचे सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:09 AM2018-12-04T02:09:17+5:302018-12-04T10:55:22+5:30

फायनान्सच्या नावाखाली वरळीतील ७० वर्षीय वृद्ध सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समाजसेवा शाखेच्या कारवाईतून उघड झाली आहे.

Older sex racket under the name of finance | फायनान्सच्या नावाखाली आजोबा चालवायचे सेक्स रॅकेट

फायनान्सच्या नावाखाली आजोबा चालवायचे सेक्स रॅकेट

googlenewsNext

मुंबई : फायनान्सच्या नावाखाली वरळीतील ७० वर्षीय वृद्ध सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समाजसेवा शाखेच्या कारवाईतून उघड झाली आहे. पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले. त्यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. रामिक भाई पटेल (७०) असे आरोपीचे नाव आहे.
वरळीच्या महालक्ष्मी को-आॅप. हाउसिंग सोसायटीत गेल्या ३ महिन्यांपासून पटेलने गजालक्ष्मी नावाने फायनान्स कंपनी सुरू केली होती. याच कंपनीच्या नावाखाली तो सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, रविवारी त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. तेव्हा पटेलने आतमध्ये ३ स्वतंत्र खोल्या तयार केल्या होत्या. त्यातून ३ मुलींना ताब्यात घेतले. त्यात एका अल्पवयीन मुलीचादेखील समावेश आहे.
दादर परिसरात पटेलचे कार्यालय आहे. गेल्या ३ महिन्यांपासून तो सेक्स रॅकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. फायनान्ससंबंधित ग्राहक येत असल्याचे समजल्यामुळे स्थानिकांनाही संशय आला नाही. यामध्ये आणखी काही जणांचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
>यापूर्वी मुलुंडचे आजी-आजोबा जाळ्यात : मुलुंडच्या एका उच्चभ्रू वसाहतीतील राहत्या घरातूनच सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आजी- आजोबांना २२ जुलै रोजी मुलुंड पोलिसांनी अटक केली होती. हरीश करमसी सोता (७२) आणि देवीबेन सोता (६५) अशी वयोवृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. ते सध्या कोठडीत आहेत. ते गेल्या २ वर्षांपासून हे सेक्स रॅकेट चालवायचे.
>व्हॉट्सअ‍ॅपद्वारे साधायचा संवाद
पटेल हा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ग्राहकांशी संवाद साधत मुलींची माहिती देत, पैसे ठरवत होता. त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या तपशिलावरूनही पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Older sex racket under the name of finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.