Join us  

‘ओमेगा’मध्ये तरुणाईचा जल्लोष

By admin | Published: March 20, 2015 12:39 AM

मालाड येथील अथर्व कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग आणि आयईईई अथर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ओमेगा’ फेस्टिव्हल मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

मुंबई : मालाड येथील अथर्व कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग आणि आयईईई अथर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ओमेगा’ फेस्टिव्हल मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. अभियांत्रिकीच्या या महोत्सवात विविध खेळ आणि स्पर्धा रंगल्या. विशेष आकर्षण ठरले ते अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंत्राचे प्रदर्शन.‘ओमेगा’ची थीम ‘शस्त्र’ ठेवण्यात आली होती. यानुसार विद्यार्थ्यांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘शस्त्र’ तयार करण्याचे तंत्र बनवले. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या नौसेना, वायुसेना आणि लष्करासाठी मिसाईल, रोबो या विद्यार्थ्यांनी तयार केले. याचे प्रदर्शन दोन दिवसांच्या या महोत्सवात मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या या प्रदर्शनला भेट देण्यास व संवाद साधण्यास नौदल, वायुदल व लष्करातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या या इनोव्हेशनबद्दल चर्चाही केली.रोबो वॉर हे विशेष आकर्षण ठरले. तसेच टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, टेक डिबेट, टेक्निकोबोटिक्स वर्कशॉप, एथिकल हॅकिंग वर्कशॉप, रुबी आॅन रेल्स सेमिनार असे कार्यक्रम तर लेझर टॅग, एरिया ५१, डिप ब्ल्यू सी, डार्क वोयागर, फिफा, डोटा २ आणि काउंटर स्ट्राइक असे मनोरंजक खेळ पार पडले. च्देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या नौसेना, वायुसेना आणि लष्करासाठी मिसाईल, रोबो या विद्यार्थ्यांनी तयार केले. याचे प्रदर्शन दोन दिवसांच्या या महोत्सवात मांडण्यात आले होते. च्विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या या प्रदर्शनाला भेट देण्यास व संवाद साधण्यास नौदल, वायुदल व लष्करातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या या इनोव्हेशनबद्दल चर्चाही केली.