Join us

नवलच! अख्खा बाजार गडगडला, पण Yes Bank चा शेअर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 2:29 PM

सोमवारी शेअर बाजार खुला होताच सर्वच आकडे लाल रंगात दिसू लागले. गुरुवारी येस बँकेवरील निर्बंध जाहीर करण्यात आले. यामुळे शुक्रवारी शेअरबाजारात मोठी घसरण झाली.

ठळक मुद्देशुक्रवारी येस बँकेचा शेअर कमालीचा आपटला. आज सुमारे 188 शेअर्समध्ये वाढ झाली तर 520 शेअर्स घसरलेवाढ झालेल्या कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, आयओसी आणि येस बँकेचा समावेश आहे.

मुंबई : मुंबई शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड नोंदविण्यात आली असून सेन्सेक्स 2342.02 अंकांनी कोसळून 35,234.60 अंकांवर स्थिरावला आहे. मात्र, आश्चर्य म्हणजे येस बँकेचा शेअर आज वाढला आहे. 

सोमवारी शेअर बाजार खुला होताच सर्वच आकडे लाल रंगात दिसू लागले. गुरुवारी येस बँकेवरील निर्बंध जाहीर करण्यात आले. यामुळे शुक्रवारी शेअरबाजारात मोठी घसरण झाली. आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये जवळपास  30 टकक्यांची घसरण झाली. याचा परिणाम भारतात दिसून आला. मुंबई शेअर बाजार जवळपास 2400 अंकांनी कोसळला. तर निफ्टी 280 अंकांनी घसरून 10704 अंकांवर आला. 

शुक्रवारी येस बँकेचा शेअर कमालीचा आपटला. आज सुमारे 188 शेअर्समध्ये वाढ झाली तर 520 शेअर्स घसरले. वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, आयओसी आणि येस बँकेचा समावेश आहे. तर  एसबीआय, ओएनजीसी, जेएसडब्ल्यू स्टील, वेदांत, हिंडाल्को, इंडसइंड बँक आणि रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

भन्नाट ऑफर! 300Mbps चा वेग, सोबत अनलिमिटेड डेटा; Jio ला करणार का टाटा?

Delhi Violence : आयबी अधिकाऱ्याची हत्या ताहिर हुसैनच्या भावाकडून? पोलिसांकडून शोध सुरूYes Bank च्या राणा कपूरला आरबीआयने असे ब्रिटनमधून 'उचलले'CoronaVirus: केरळमध्ये तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाचे संक्रमण; देशभरातील आकडा 41 वरशाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटकगेल्या दोन दिवसांपासून झालेल्या घडामोडींमध्ये एसबीआय येस बँकेत 49 टक्के गुंतवणूक करणार असल्याने पार रसातळाला गेलेला येस बँकेचा शेअर 30 टक्क्यांनी वधारला. पण याचा फटका एसबीआयला बसला असून 6 टक्क्यांनी पडला आहे. आज येस बँकेचा शेअर 4.90 रुपयांनी वाढला असून 21.10 वर गेला आहे. तर एसबीआयचा शेअर 16.85 रुपयांनी घसरला असून 254 रुपयांवर स्थिरावला आहे. 

टॅग्स :येस बँकशेअर बाजारएसबीआयभारतीय रिझर्व्ह बँक