Omicron News: धोका वाढला! मुंबईत ओमायक्रॉनच्या सामुदायिक प्रसाराला सुरुवात; INSACOGचा झोप उडवणारा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:20 PM2022-01-24T12:20:18+5:302022-01-24T12:22:06+5:30

Omicron News: देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

Omicron Enters Community Transmission Stage In India All You Need To Know | Omicron News: धोका वाढला! मुंबईत ओमायक्रॉनच्या सामुदायिक प्रसाराला सुरुवात; INSACOGचा झोप उडवणारा अहवाल

Omicron News: धोका वाढला! मुंबईत ओमायक्रॉनच्या सामुदायिक प्रसाराला सुरुवात; INSACOGचा झोप उडवणारा अहवाल

Next

मुंबई: कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट कम्युनिटी ट्रान्समिशनच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्णालयं आणि आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. INSACOGनं याबद्दलचा अहवाल दिला आहे. या अहवालातून चिंता वाढवणारी माहिती पुढे आली आहे. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये ओमायक्रॉनच्या सामुदायिक प्रसाराला सुरुवात झाली असून रुग्णसंख्या वेगानं वाढू शकते, असा धोक्याचा इशारा INSACOGनं अहवालातून दिला आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या जीनॉमिक्स कंसोर्टियम INSACOGनं आपल्या अहवालातून महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलं आहे. आरोग्य मंत्रालयानं २०२० नंतर सामुदायिक संसर्ग या संज्ञेचा वापर केला नव्हता. आरोग्य आणि बायोटेक्नॉलॉजी मंत्रालयानं सीएसआयआर आणि आयसीएमआरच्या मदतीनं INSACOGची सुरुवात केली. 

डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी विषाणू संपूर्ण देशात एकाच पद्धतीनं पसरत नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं होतं. विविध जागी महामारीचा पॅटर्न वेगळा असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पसरतो, त्याला सामुदायिक प्रसार म्हटलं जातं. अशा स्थितीत संक्रमणाचं नेमकं उगमस्थान शोधून काढणं कठीण होतं.

ओमायक्रॉन रुग्णांपैकी बहुतांश जणांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत किंवा सौम्य स्वरुपाची लक्षणं दिसतात. तिसऱ्या लाटेत रुग्णालयाची, आयसीयूची गरज भासणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA2 देशात सापडला आहे. सुरुवातीला आढळून आलेले ओमायक्रॉन बाधित परदेशांमधून आलेले होते. त्यानंतर या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना लागण होऊ लागली. आता सामुदायिक प्रसाराला सुरुवात झाली आहे.

Read in English

Web Title: Omicron Enters Community Transmission Stage In India All You Need To Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.