Omicron: देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले विधानसभेत संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 01:20 PM2021-12-23T13:20:04+5:302021-12-23T13:20:25+5:30

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉन बाधित सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे

Omicron: Will there be night lockdown in the country? DCM Ajit Pawar Warned in Assembly | Omicron: देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले विधानसभेत संकेत

Omicron: देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले विधानसभेत संकेत

Next

मुंबई – अधिवेशन सुरु झाल्यापासून आज दुसरा दिवस आहे. आपण प्रत्येकजण ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात बसतो. देशाचे पंतप्रधानदेखील कोरोना संकटावर गांभीर्याने विचार करतायेत. सध्या कोरोनाचं संकट आहे त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करत आहे. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. काही ठराविक सोडले तर सभागृहात अजिबात काही जण मास्क घालत नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले की, काही जणांना मास्क घालता बोलता येत नाही. परंतु बोलून झाल्यानंतरही मास्क लावलं पाहिजे. इतकी वाईट परिस्थिती आहे की कोणालाही याचा अंदाज नाही. परदेशात दिड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या वाढतेय इतकी भीषण स्थिती आहे. ज्या त्या वेळेत कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. मास्क न लावणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढा. मास्क घातला नाही तर कितीही कोणी प्रयत्न केला तर हे नियंत्रणात येणार नाही. आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर व्हायरल होतात. ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा असं त्यांनी सांगितले.

भारतात ओमायक्रॉनची चिंता वाढली

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉन बाधित सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे. राज्येही वाढू लागली आहेत. १४ राज्यांत एकूण २२० हून अधिक जणांना ओमायक्रॉनी बाधा झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यात आघाडीवर आहेत. यामुळे केंद्र सरकारचे टेन्शन वाढू लागले आहे. असे असले तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर नाहीत. सध्या सुट्यांचा मौसम सुरु आहे. यामुळे ओमायक्रॉन वाढण्याची शक्यता असल्याने याचे संक्रमण रोखण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना लोकांनी पाळल्या नाही आणि रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर गेली तर पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये राज्यांनी परिस्थिती पाहून त्वरीत नाईट कर्फ्यू आणि कंटेनमेंट झोन सारखे उपाय करण्यासाठी अलर्ट रहावे असे म्हटले आहे. गेल्या १८ दिवसांत ही संख्या १०० पटींनी वाढली आहे. परंतु कोणत्याही रुग्णाला आयसीयूमध्ये जावे लागलेले नाही, ही दिलासा देणारी बाब आहे.

कंटेनमेंट झोन: विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रात्रीचा कर्फ्यू, सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी थांबवावी लागेल. विवाह आणि अंत्यसंस्कारातील लोकांची संख्या मर्यादित ठेवावी लागेल. कार्यालये, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये नियमांची अंमलबजावणी करावी लागेल. रुग्णांच्या संख्येनुसार कंटेनमेंट झोन आणि बफर झोन निश्चित करावे लागतील. जीनोम सिक्वेन्सिंग प्राधान्याने केले पाहिजे.

ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानकांनुसार तपासणी आणि लक्ष ठेवणे ही प्रणाली लागू केली जावी. घरोघरी जाऊन रुग्णाची ओळख पटवण्यासाठी सर्वेक्षण केले पाहिजे. आरटी-पीसीआर चाचणीचे दर वाढवावेत. कोरोनाबाधित व्यक्तीला वेळेवर तपासणी करून उपचाराची सुविधा मिळावी. परदेशातून येणाऱ्या लोकांवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवावे.

क्लिनिकल मॅनेजमेंट: ओमिक्रॉनच्या वाढत्या व्याप्तीनुसार हॉस्पिटलमध्ये बेडची क्षमता वाढवली पाहिजे. रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, औषधांचा साठा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवावा. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी किट उपलब्ध करून द्याव्यात. कॉल सेंटर्स आणि घरोघरी भेटी देऊन रुग्णांवर लक्ष ठेवले पाहिजे. त्याचा उद्देश संसर्गाचा प्रसार रोखणे हा आहे.

Web Title: Omicron: Will there be night lockdown in the country? DCM Ajit Pawar Warned in Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.