समुद्रात जाऊ नका, चार दिवस मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार, पालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:54 AM2024-06-06T10:54:35+5:302024-06-06T10:56:09+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
मुंबई : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ५ ते ८ जूनदरम्यान दररोज समुद्रात मोठी भरती येणार आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांत एकूण २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सगळ्यात मोठी भरती २० सप्टेंबर रोजी येणार असून यावेळी ४.८० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे.
१) चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही.
२) त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते.
३) त्यामुळे सखल भागात पाणी साचते. त्यामुळे भरती-ओहोटीच्या वेळा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.