Join us

गुढीपाडव्यापासून मुंबई सुस्साट, दोन मेट्रोचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 9:27 PM

मेट्रो 7 अंधेरी-पूर्व ते दहिसर आणि मेट्रो-2 अ डीएन नगर ते दहिसर या दोन मार्गिका मुंबईकरांसाठी खूप महत्वाच्या आहेत

मुंबईमुंबईकरांचा प्रवास अधिक गतीमान होणार असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई मेट्रो 7 अंधेरी-पूर्व ते दहिसर आणि मेट्रो-2 अ डीएन नगर ते दहिसर या दोन मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांना मुक्‍ती मिळणार आहे.  गुढीपाडव्याच्या दिवशी या दोन्ही मार्गाचे मुख्यमंत्री लोकापर्ण करणार आहे.

मेट्रो 7 अंधेरी-पूर्व ते दहिसर आणि मेट्रो-2 अ डीएन नगर ते दहिसर या दोन मार्गिका मुंबईकरांसाठी खूप महत्वाच्या आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांचे भूमिपूजन ऑक्टोबर 2015 ला झाले होते. तर प्रत्यक्षात कामाला 2016 मध्ये सुरुवात झाली होती. कोरोनमुळे या दोन्ही मेट्रो मार्गिकांचे काम संथ गतीने सुरू होते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मेट्रो 7 अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - 2 अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिकांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.

आता दोन्ही मार्गांवरील सीएमआरएसच्या पथकाकडून सुरक्षा चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित पश्चिम उपनगरातील मेट्रो आता धावणार असून यानिमित्ताने मुंबईचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. मेट्रो - 2 अ डीएन नगर ते दहिसरपर्यंत असणार आहेत. या 18.5 किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च 6 हजार 410 कोटी रुपये इतका आहे. यात आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीनगर, कामराजनगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्कसह एकूण 16 स्थानके असणार आहेत.

टॅग्स :मेट्रोउद्धव ठाकरेमुंबई