Anil Deshmukh: पतीला भेटातच आरती देशमुखांना अश्रृ अनावर; अनिल देशमुखही झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 07:28 PM2022-12-28T19:28:23+5:302022-12-28T19:30:56+5:30

अनिल देशमुख यांना भेटताच त्यांच्या पत्नी आरती देशमुख भावूक झाल्याचे दिसून आले.

On meeting Anil Deshmukh, his wife Aarti Deshmukh was seen getting emotional. | Anil Deshmukh: पतीला भेटातच आरती देशमुखांना अश्रृ अनावर; अनिल देशमुखही झाले भावूक

Anil Deshmukh: पतीला भेटातच आरती देशमुखांना अश्रृ अनावर; अनिल देशमुखही झाले भावूक

googlenewsNext

मुंबई- १०० कोटी वसुली प्रकरणात कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज कारागृहाबाहेर आले आहेत. देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती आणखी वाढविण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली होती. त्यानंतर आज देशमुखांचा जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर दुपारी पाच वाजता अनिल देशमुख कारागृहा बाहेर आले. 

अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आज राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील कारागृहाबाहेर उपस्थित होते. अनिल देशमुख यांचं हार घालून स्वागत करण्यात आलं. तर कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा केला. कारागृहाबाहेर यावेळी प्रचंड गर्दी झाली असून ढोल-ताशांच्या गजरात देशमुख यांचं स्वागत करण्यात आलं आहे. 

अनिल देशमुख यांना भेटताच त्यांच्या पत्नी आरती देशमुख भावूक झाल्याचे दिसून आले. अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची बाईक रॅली सिद्धिविनायक मंदिर येथे पोहोचल्यानंतर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख आणि इतर कुटुंबियसु्द्धा तिथे उपस्थित होते. यावेळी आरती देशमुख यांना रडू कोसळलं.

दरम्यान, १२ डिसेंबरला न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने देशमुख यांना जामीन मंजूर केला. नंतर सीबीआयने सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी जामिनावर १० दिवसांची स्थगिती देण्याची विनंती केली होती. ती मान्य झाली. मात्र, सुप्रीम कोर्टाचे सुटीकालीन कोर्ट नसल्याने सीबीआयने पुन्हा हायकोर्टात जामिनावरील स्थगिती ३ जानेवारीपर्यंत वाढविण्याची विनंती केली. मात्र, कोर्टाने ती अमान्य केली होती. 

मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं- अनिल देशमुख

कारागृहाबाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं. तसेच माझ्यावरील आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. सचिन वाझेंनी केलेल्या आरोपत देखील तथ्य नाही. माझ्यावरील आरोप ऐकीव माहितीवरुन करण्यात आल्याचं कोर्टाने सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: On meeting Anil Deshmukh, his wife Aarti Deshmukh was seen getting emotional.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.