पावसाळा तोंडावर, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 10:10 AM2023-05-27T10:10:45+5:302023-05-27T10:10:54+5:30

६ हजारांहून अधिक संस्था, सोसायट्यांना पालिकेच्या नोटीस

On the eve of monsoon, did you cut the dangerous branches of the trees? | पावसाळा तोंडावर, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटल्या का?

पावसाळा तोंडावर, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटल्या का?

googlenewsNext

- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असला, तरी मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी अद्याप झालेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत अतिवृष्टी व जोराच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, तसेच वृक्षांच्या फांद्या मोडून पडल्याने अपघात होतात. 

त्यामुळे पालिकेतर्फे रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. दरम्यान, उद्यान विभागाच्या आकडेवारीनुसार अद्यापही मुंबईतील ५४ हजार झाडांची छाटणी अद्याप बाकी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये खासगी सोसायट्या, सरकारी संस्था यांच्या आवारातील झाडांची छाटणीही शिल्लक असून, पालिकेकडून आतापर्यंत ६ हजारांहून अधिक संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

छाटणी नीट होतेय का?
मुंबईतील १ लाख ३२ हजार झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामधील रस्त्यालगत असलेल्या ९७ हजार झाडांची छाटणी आवश्यक असून, त्यापैकी ४३ हजार झाडांची  छाटणी पालिकेकडून करण्यात आली आहे. उद्यान विभागाच्या सर्वेक्षणानुसार, झुकलेल्या १,८१४ झाडांच्या फांद्यांची छाटणी होणे गरजेचे आहे. 

सर्वाधिक सोसायट्या अंधेरी, विलेपार्लेमधील
n आतापर्यंत पालिकेने नोटिसा पाठविलेल्या सोसायट्यांपैकी सर्वाधिक २ हजार १२० सोसायट्या या के-पश्चिम विभागातील म्हणजे बोरिवली, विलेपार्ले, अंधेरी मार्केट या परिसरात आहेत. त्या खोलाखाल पी-उत्तर आणि एफ-उत्तर परिसरातील सर्वाधिक नोटिसा पाठविल्या आहेत. 
n दरम्यान, अतिशय धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी आधीच करण्यात आली आहे. उर्वरित झाडांमध्ये थोडीफार फांद्यांची छाटणी शिल्लक असून, ती पावसाळय़ात केली जाते, अशी माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

१,८६,४५२ 
मुंबईतील एकूण झाडे 
१,३२,०१८ 
छाटणी आवश्यक असलेली झाडे 
९७,६५४ 
रस्त्यांच्या कडेला असलेली छाटणीची झाडे 
४३,०४८
रस्त्यांच्या कडेला छाटणी झालेली झाडे

Web Title: On the eve of monsoon, did you cut the dangerous branches of the trees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.