नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १७ सप्टेंबर रोजी देशभरात वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सराकारने मोदींच्या वाढदिवसाचेनिमित्त साधत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही साजरा करण्याचा आणि आपत्ती प्रवण क्षेत्रासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
१७ तारखेला पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींचा आग्रह असतो की माझा वाढदिवस साजरा करू नका, जनतेची सेवा करा, त्यामुळे सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, 'राज्यामध्ये जे आपत्ती प्रवन श्रेत्रासाठी कोणते धोरण नाही, त्यामुळे या सर्व जिल्ह्यात अतिसंवदेनशील क्षेत्र आहे, त्यांचे पुर्नवसन केले जाणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
आपत्ती प्रवण क्षेत्रासाठी सध्या कुठंलही धोरण नाही. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भातील एक चांगलं धोरण तयार केलं आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि तत्सम यंत्रणांना आपत्ती प्रवण क्षेत्र चिन्हांकीत करुन अतिसंवेदनशील क्षेत्रांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील उर्द्व गोदावरी प्रकल्पालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सिन्नरमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, विक्रीकराची प्राधीकरणाला २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या योजनेनुसार ग्रामीण भागातील पतसंस्थांचे संगणकीकरण करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.