Join us  

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गिरगाव येथील शाहु स्मृतिस्तंभावर विचार जागर  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 7:10 PM

मुंबई गिरगाव खेतवाडी गल्ली नंबर १३ पन्हाळा लॉज येथे राजर्षी शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. मुंबई महापालिकेने येथे आकर्षक पद्धतीने घडीव दगडी कातळ स्मृतिस्तंभ उभारला आहे. त्याची उंची १२ फूट आहे. राजर्षींच्या जयंतीनिमित्त शाहू स्मारक समिती, मुंबईच्या कार्यकर्त्यानी येथे सामूहिक अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

श्रीकांत जाधव -मुंबई : लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील खेतवाडी स्मृतिस्तंभावर बुधवारी पालिका, पोलीस आणि शाहू स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांनी शाहू विचारांचा जागर करीत मोठ्या उत्साहात शाहु जयंती साजरी केली. यावेळी शाहू महाराजांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. मुंबई गिरगाव खेतवाडी गल्ली नंबर १३ पन्हाळा लॉज येथे राजर्षी शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. मुंबई महापालिकेने येथे आकर्षक पद्धतीने घडीव दगडी कातळ स्मृतिस्तंभ उभारला आहे. त्याची उंची १२ फूट आहे. राजर्षींच्या जयंतीनिमित्त शाहू स्मारक समिती, मुंबईच्या कार्यकर्त्यानी येथे सामूहिक अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबईचे पदाधिकारी नरेश मोरे, संतोष साळवी, सचिव भालचंद्र धुरी, शंकर मोहिते, निवृत्त पोलीस एसीपी रवी सरदेसाई, शाहू स्मारक समितीच्या मुंबई संघटक प्रज्ञा जाधव, सुमित्र पतपेढीचे संचालक प्रवीण घाग, चंद्रकांत पाटील, गणपत जाधव, अशोक देसाई, सुजय पाटील. शामराव मोहिते पाटील, मधुकर मेटील,पो. नि. विनय घोरपडे, निलेश शिरधनकर अर्चित साखळकर, नागेश हातणकर, सुजय सावंत, संतोष शिंदे, स्वाती गाजरे, जयेश रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. जयंतीनिमित्त मुंबईसह कोल्हापुरातील शाहूप्रेमीनीं मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबई