खरेदीचा सुवर्णकाळ; गणेशोत्सवातही सोन्याचे भाव वाढणार, तुम्ही किती सोने घेतले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:32 PM2023-09-08T12:32:25+5:302023-09-08T12:33:37+5:30

गणेशोत्सवातही सोन्याची तेजी येईल, असा दावा सराफ बाजाराने केला आहे.

On the occasion of Rakhi Purnima, there have been transactions worth around 350 crores in the bullion market of Mumbai. | खरेदीचा सुवर्णकाळ; गणेशोत्सवातही सोन्याचे भाव वाढणार, तुम्ही किती सोने घेतले?

खरेदीचा सुवर्णकाळ; गणेशोत्सवातही सोन्याचे भाव वाढणार, तुम्ही किती सोने घेतले?

googlenewsNext

मुंबई : जगभरातल्या सगळ्या बाजारपेठांना आर्थिक फटका बसला तरी सोने-चांदीची बाजारपेठ मात्र नेहमीच चकाकत असते. नुकत्याच झालेल्या राखीपौर्णिमेच्या निमित्ताने मुंबईच्या सराफ बाजाराने तब्बल ३५० कोटी रुपयांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले असून, गणेशोत्सवातही सोन्याची तेजी येईल, असा दावा सराफ बाजाराने केला आहे.

रियासकल गोल्डला मागणी आहे. ग्राहक येत आहेत. जुने दागिने देत नवीन दागिने घेऊन जात आहेत.आता लग्नासाठीही खरेदी सुरु आहे. कारण सोन्याचे भाव पुन्हा वाढतील, असे ग्राहकांना वाटत आहे. त्यामुळे घरातील सोने बाहेर काढत आहेत. आणि बाजारपेठांतून खरेदीही करत आहेत. गणेशोत्सवातही सोन्याचे भाव वाढतील.

ग्राहक खरेदी जोमाने करत आहेत. छोट्या दागिन्यांची खरेदी विक्री जोमाने सुरु आहे. यात सोनसाखळी, अंगठी, पेंडंट याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेली सोन्याची बाजारपेठ आता चकाकत आहे.सोने जेव्हा आयात होते तेव्हा ते बुलियन मर्चंटकडे जाते. तेथून होलसेलकडे जाते. होलसेलकडून रिटेलकडे जाते. रिटेलमधून मग ग्राहकाकडे जाते, अशी साखळी आहे. पुणे, बंगळुरू, गुजरातसह जवळच्या राज्यातून लोक झवेरी बाजारात येतात.

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मुंबईच्या सराफ बाजारात सुमारे ३५० कोटींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. आता सोन्याचा भाव हा प्रतितोळा ६० ते ६१ हजार असा आहे.
    - कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन

Web Title: On the occasion of Rakhi Purnima, there have been transactions worth around 350 crores in the bullion market of Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.