Join us

जागतिक मच्छिमार दिनी २१ नोव्हेंबरला केंद्र अन् राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

By मनोहर कुंभेजकर | Published: November 07, 2022 12:55 PM

२१ नोव्हेंबर रोजी जागतिक मच्छिमार दिना दिनी सकाळी १० वाजता वाढवण बंदरा विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.

मुंबई- एकच जिद्द वाढवण बंदर रद्द! वाढवण बंदरातून जेएनपीटी चले जाव या व इतर मागण्यांसाठी जागतिक मच्छिमार दिनी दिनांक २१ रोजी केंद्र व राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती,नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF), महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, (MMKS) ठाणे जिल्हा मच्छिमार मध्य.सहकारी संघ लि,ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ,पालघर तसेच कष्टकरी व आदिवासी एकता परिषद या विविध संघटनांच्या नेतृत्वाखालील सोमवार दि,२१ नोव्हेंबर रोजी जागतिक मच्छिमार दिना दिनी सकाळी १० वाजता वाढवण बंदरा विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला ही माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागत १०,०००/- च्या वर  मासेमारी नौका नोंदणीकृत आहेत. सन २०२२-२३ करिता ७१३१ नौकांची संख्या आहे. ही संख्या कमी असल्याचे कारण १२० हाॅर्सपावर व त्यावरील हाॅर्सपावर असलेल्या ३,०००/- पेक्षा जास्त मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर न केल्यामुळे संख्या कमी दिसत आहे. यांच्यातील पालघर, ठाणे, मुंबई येथील हंगामानुसार  ६५००/७५०० मासेमारी नौका सदर समुद्र क्षेत्रात मासेमारी करतात.

सदर सागरी क्षेत्र प्रजनन, मत्स्य संवर्धन, जैविक विविधता करिता तसेच मासेमारी साठी गोल्डन बेल्ट परिसर आहे. हेच क्षेत्र हिरावून पाच लाखांहून अधिक मच्छिमार व त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचा उदरनिर्वाह हिरावून मच्छिमार, शेतकरी, बागायतदार आदिवासी, डायमेकर यांना देशोधडीला लावणा-या वाढवण बंदरास विरोध करणा-यासाठी जागतिक मच्छिमार दिनी  सकाळी १० वाजता गिरगांव चौपाटी (तारापोरवाला मत्स्यालय) ते आझाद मैदान मोर्चा व आझाद मैदानवर सभेत रूपांतर होईल अशी माहिती किरण कोळी यांनी दिली.

टॅग्स :मच्छीमारमहाराष्ट्र सरकार