पुन्हा एकदा दैनंदिन काेराेना रुग्णांचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:07 AM2021-03-25T04:07:12+5:302021-03-25T04:07:12+5:30

पुन्हा एकदा दैनंदिन काेराेना रुग्णांचा उच्चांक राज्यात दिवसभरात ३१ हजार ८५५, तर मुंबईत पाच हजार १८५ रुग्ण लोकमत न्यूज ...

Once again the daily carina patient surge | पुन्हा एकदा दैनंदिन काेराेना रुग्णांचा उच्चांक

पुन्हा एकदा दैनंदिन काेराेना रुग्णांचा उच्चांक

Next

पुन्हा एकदा दैनंदिन काेराेना रुग्णांचा उच्चांक

राज्यात दिवसभरात ३१ हजार ८५५, तर मुंबईत पाच हजार १८५ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी पुन्हा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून, दिवसभरात ३१ हजार ८५५ रुग्ण आणि ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २५ लाख ६४ हजार ८८१ झाला असून, बळींची संख्या ५३ हजार ६८४ झाली आहे. मुंबईतही सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात पाच हजार १९० रुग्ण आणि सहा मृत्यूंची नोंद झाली.

सध्या राज्यात दोन लाख ४७ हजार २९९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात दिवसभरात १५ हजार ९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २२ लाख ६२ हजार ५९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२१ टक्के झाले असून, मृत्युदर २.०९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी ८७ लाख २५ हजार ३०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.७० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १२ लाख ६० हजार ९४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, १३ हजार ४९९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ९५ मृत्यूंमध्ये मुंबई ६, ठाणे १, नवी मुंबई मनपा १, कल्याण-डोंबिवली मनपा ५, मीरा-भाईंदर मनपा १, पनवेल मनपा १, नाशिक ३, नाशिक मनपा ६, जळगाव मनपा १, नंदुरबार २, पुणे २, पुणे मनपा २, पिंपरी-चिंचवड मनपा ३, सातारा २, कोल्हापूर १, सांगली १, सिंधुदुर्ग १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, लातूर १, बीड १, नांदेड २, नांदेड मनपा ३, अकोला मनपा २, अमरावती ५, यवतमाळ १, वाशिम १, नागपूर १०, नागपूर मनपा १९, वर्धा ३, भंडारा ३, गोंदिया १ इत्याची रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईत दिवसभरात पाच हजार १८५ नवे कोरोनाबाधित सापडले असून, मुंबईतल्या एकूण बाधितांची संख्या आता तीन लाख ७४ हजार ६११ इतकी झाली आहे. त्यापैकी ३० हजार ७६० सक्रिय रुग्ण सध्या मुंबईत आहेत. कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने तीन हजारांच्या वर रुग्ण सापडत असताना अचानक ही रुग्णवाढ पाच हजारांच्या वर गेली आहे. दिवसभरात मुंबईत सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा आता ११ हजार ६०६वर पोहोचला आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९० टक्के झाला असून, १७ ते २३ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.७९ टक्के झाला आहे. शहर उपनगरात कोरोनाच्या आतापर्यंत ३७ लाख ९४ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर मुंबईत रुग्ण दुप्पटीचा काळ ८४ दिवसांवर आला आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ३९ असून, सक्रिय सीलबंद इमारती ४३२ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २२ हजार ४७२ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

राज्यातील आकडेवारी

* रुग्ण प्रति दशलक्ष लोकसंख्या - १९ हजार ९७२

* रुग्ण दुप्पटीचा काळ ६३.७३ दिवस

* एकूण उपचाराधीन रुग्ण - दोन लाख ४७ हजार २९९

* रुग्णालयात भरती असलेले रुग्ण ८९ हजार ३३२

* लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण - ७१ हजार ८०४ रुग्ण

* गंभीर रुग्ण १७ हजार ५२८

* अतिदक्षता विभागातील रुग्ण सात हजार ९८, व्हेंटिलेटरवरील रुग्ण एक हजार ५१८, ऑक्सिजनवरील रुग्ण पाच हजार ५८० रुग्ण

* अतिदक्षता विभागाबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण १० हजार ४३०

Web Title: Once again the daily carina patient surge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.