महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लावा; डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: December 21, 2022 06:59 PM2022-12-21T18:59:10+5:302022-12-21T19:01:57+5:30

मुंबई व महाराष्ट्रात कोरोनाचा होणाऱ्या संसर्गाला रोखण्यासाठी  महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बध लावा अशी मागणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज एका पत्राद्वारे केली आहे.

Once again impose corona restrictions in Maharashtra; Dr. Deepak Sawant's demand to the Chief Minister | महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लावा; डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लावा; डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next

मुंबई - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले असून येथे मृत्यूदर देखील वाढले आहेत. चार दिवसांनी ख्रिसमस आहे. याकाळात जगभर नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जगभर नागरिक पर्यटनासाठी बाहेर निघाले आहेत. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्हायरस म्युटेट झाल्याने बीएफ7 हे स्वरूप प्राप्त केले असल्याने  जिनोम सिक्वेन्सिंग मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्रात कोरोनाचा होणाऱ्या संसर्गाला रोखण्यासाठी  महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बध लावा अशी मागणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज एका पत्राद्वारे केली आहे. चीन, ब्राझील, युरोपियन देश,अमेरिका,हिंगकाँग,सिंगापूर येथून एअरपोर्ट,जलमार्गा द्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोविडसाठी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी होईल यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी एन.आय.व्ही(पुणे) यांच्याशी चर्चा करून दि, 31 डिसेंबर साजरा करण्याबाबत निर्णय घ्यावा.कारण कोविड लसीकरणाची मात्रा आता बोथट झाल्याने प्रचिलीत वॅक्सिनची परिणामकता किती होईल हे सांगता येणार नाही.जिनोम सिक्वेन्सिंगमुळे कोविडचे नेमके स्वरूप समजेल.त्यामुळे जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग वाढवणे,सोशल डिस्टनसिंग पाळणे, सॅनिटायझर वापरणे, प्रवासात मास्क वापरण्याचे निर्बंध हे किती परिणामकारक ठरेल हे काळच ठरवेल असे मत डॉ.दीपक सावंत यांनी शेवटी व्यक्त केले.
 

Web Title: Once again impose corona restrictions in Maharashtra; Dr. Deepak Sawant's demand to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.